नाशिक

वाचनातून ज्ञान मिळवा, जळगावचे नाव उंचवा

CD
टुडे ३ : सेकंड मेन NSK26H32495 जळगाव : विद्यार्थ्यांना प्रतिनीधीक स्वरुपात एनआयई पेपर व शैक्षणिक साहित्य देताना मान्यवर. --------------- NSK26H32496 जळगाव : ‘सकाळ-एनआयई’ पेपरचे वाचन करताना विद्यार्थीनी ------------- NSK26H32498 ‘सकाळ-एनआयई’ अंकासोबत विद्यार्थी. ........... वाचनातून ज्ञान मिळवा, जळगावचे नाव उंचवा ‘सकाळ-एनआयई’ आणि मनपाचा संयुक्त उपक्रम; विद्यार्थ्यांना अंक व वह्यांचे वितरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : जीवनात कोणीही सर्वज्ञानी नसते; मात्र वाचनामुळे आपल्या ज्ञानात सातत्याने भर पडत असते. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासली पाहिजे. वाचनाची सवय नसेल, तर आवडीच्या विषयांपासून सुरुवात करून ती विकसित करा. वाचनातून मिळणाऱ्या ज्ञानाच्या शिदोरीच्या बळावर विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती साधत जळगावचे नाव मोठे करावे, असे मार्गदर्शन महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांना केले. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १५) वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी ‘सकाळ-एनआयई’ आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विशेष अंक वितरण सोहळ्याचे आयोजन श्री मनपा केंद्र शाळा क्रमांक २ (चौबे शाळा) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दीपमाला काळे होत्या. उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त पंकज गोसावी, मनपा शिक्षण प्रशासन अधिकारी खलील शेख आणि नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना ‘सकाळ-एनआयई’चे अंक आणि वह्यांचे वितरण करण्यात आले. यशस्वितेसाठी मनपा शिक्षण विभागाचे वरिष्ठ लेखा सहायक गणेश चौधरी, मनपा केंद्र शाळा क्रमांक दोनचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत, मनपा साने गुरुजी वाचनालयाचे ग्रंथपाल मनीराम डाबोरे आणि शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. चित्रा पगारे यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमाला नोबेल फाउंडेशन आणि शारदा बुक डेपो, जळगाव यांचे विशेष सहकार्य लाभले. दररोज वाचन करून नोंदी काढा विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुरुवातीला दररोज किमान २० मिनिटे वाचन करावे. वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी काढण्याची सवय लावावी. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासासोबत विविध विषयांचे वाचन केल्यास यशाचा मार्ग सुकर होतो, असे मार्गदर्शन अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांनी केले. मातीतले मोती घडविण्याचे काम शिक्षकांचे नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील यांनी डॉ. कलाम यांच्या बालपणीच्या प्रसंगांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. ‘सकाळ-एनआयई’चा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचेही कौतुक केले. (चौकट) नाटिकेतून वाचनाचे महत्त्व मनपा शाळा क्रमांक दोनच्या विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व आणि निरक्षरतेमुळे उद्भवणाऱ्या अडचणींवर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. विद्यार्थिनी कशीश अमरपासी हिने डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा परिचय भाषणातून करून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Strict Action : मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग अन् भेसळीला पूर्ण बंदी! आयुक्त तुकाराम मुंढेंकडून कडक नियमावली जारी; नियम मोडल्यास थेट कारवाई

Medical Courses : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Update: लैंगिक शोषणप्रकरणी कोऱ्हाळे खुर्द येथील तरुणावर गुन्हा

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

SCROLL FOR NEXT