नाशिक

''सकाळ प्रिमियर लीग'' क्रिकेट स्‍पर्धेचा २२ डिसेंबरपासून थरार

CD
सकाळ एसपीएल आणि जिल्‍हा क्रिकेट असोसिएशन (प्रतीककडे लोगो उपलब्‍ध आहेत) समवेत छायाचित्र (विकी कदम देत आहेत) -------- फोटो : H34484 नाशिक : ‘सकाळ प्रीमियर लीग’चे लोगो अनावरण करताना जिल्‍हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, जी शॉपीचे संचालक जितेंद्र गाडेकर, मराठा वॉरिअर्सचे वैभव पाटील, द रायझिंग स्‍टार्सचे प्रिन्‍सी लांबा, सहसचिव चंद्रशेखर दंदणे, आर्या इन्‍फाटेकचे आर्य बच्छाव, मेरी क्रिकेट क्‍लबचे श्रीपाद भट, ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, मुख्य व्‍यवस्‍थापक (जाहिरात) मारुती दातीर. ‘सकाळ प्रिमिअर लीग’ चा २२ डिसेंबरपासून थरार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते लोगोचे अनावरण; यंदा २५ वर्षाआतील खेळाडूंना संधी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे आयोजित व नाशिक जिल्‍हा क्रिकेट असोसिएशनच्‍या सहकार्याने ‘सकाळ प्रिमिअर लीग’ च्‍या दुसऱ्या हंगामाचे आयोजन यंदा केले जाणार आहे. येत्‍या २२ ते ३० डिसेंबरदरम्‍यान हुतात्‍मा अनंत कान्‍हेरे मैदानावर नियोजित असलेल्‍या या स्‍पर्धेच्‍या लोगोचे अनावरण बुधवारी (ता. ४) ‘सकाळ’ च्‍या मुंबई नाका येथील कार्यालयात झाले. यंदा या स्‍पर्धेत २५ वर्षाआतील खेळाडूंना सहभागाची संधी उपलब्‍ध असेल. स्‍पर्धा लोगो अनावरणप्रसंगी जिल्‍हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, सहसचिव चंद्रशेखर दंदणे, जी शॉपीचे संचालक जितेंद्र गाडेकर, मेरी क्रिकेट क्‍लबचे श्रीपाद भट, मराठा वॉरिअर्सचे वैभव पाटील, द रायझिंग स्‍टार्सचे प्रिन्‍सी लांबा, आर्या इन्‍फाटेकतर्फे आर्य बच्‍छाव आदी उपस्‍थित होते. मान्‍यवरांचे स्‍वागत ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्‍यवस्‍थापक संजय पाटील यांनी केले. गेल्‍यावर्षी आयोजित स्‍पर्धेतील क्षणचित्रे विशद करणारी चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. यानंतर यंदा स्‍पर्धा आयोजनाबाबत चर्चा झाली. गेल्‍यावर्षी ही स्‍पर्धा २३ वर्षाआतील खेळाडूंसाठी होती. यंदा २५ वर्षाआतील खेळाडूंच्‍या सहभागाबाबत सकारात्‍मक निर्णय घेण्यात आला. प्रास्‍ताविकात अभय सुपेकर म्‍हणाले, की क्रिकेट असोसिएशनच्‍या सहकार्याने व संघ मालकांच्‍या उत्‍स्‍फूर्त सहभागातून गेल्‍यावर्षी ही स्‍पर्धा रोमहर्षक ठरली होती. हाच उत्‍साह यंदाही कायम राहणार असून, क्रीडाप्रेमींमध्ये स्‍पर्धेविषयी उत्‍सुकता आहे. संजय पाटील म्‍हणाले, की या स्‍पर्धेतील सहभागी खेळाडू व संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍याशी एकप्रकारे कौटुंबिक नाते निर्माण झाले होते. यंदा स्‍पर्धा अधिक व्‍यापक स्वरूपात आयोजित करण्यावर भर असेल. समारोपाप्रसंगी ‘सकाळ’चे मुख्य व्‍यवस्‍थापक (जाहिरात) मारुती दातीर यांनी आभार मानले. शरद धात्रक यांनी सूत्रसंचालन केले. ---- कोट फोटो : H34481 उदयोन्‍मुख खेळाडूंना व्‍यासपीठ उपलब्‍ध करण्याच्‍या उद्देशाने गेल्‍यावर्षी आयोजित सकाळ प्रीमियर लीग स्‍पर्धेचे सकारात्‍मक परिणाम बघायला मिळाले. या स्‍पर्धेतून अनेक खेळाडू पुढे आले. यंदाही या स्‍पर्धेनिमित्त खेळाडूंना सुवर्णसंधी मिळेल, असा विश्‍वास वाटतो. संघटनेतर्फे स्‍पर्धेसाठी सर्व सहकार्य केले जाईल. - विनोद शहा, अध्यक्ष, जिल्‍हा क्रिकेट असोसिएशन. ---कोट फोटो : H34480 स्‍पर्धेच्‍या माध्यमातून ‘सकाळ’च्‍या या सामाजिक उपक्रमात आमचा नेहमीच सहभाग राहिला आहे. क्रिकेट खेळाला व खेळाडूंना प्रोत्‍साहन देण्यासाठी ही स्‍पर्धा चांगले माध्यम ठरते आहे. यंदाही आम्‍ही स्‍पर्धेत चांगली कामगिरीसाठी उत्‍सुक आहोत. - जितेंद्र गाडेकर. ---कोट फोटो : H34479 ‘सकाळ प्रीमियर लीग’ खेळाडू व क्रीडाप्रेमी दोन्‍हींसाठी अविस्‍मरणीय ठरली होती. मोठ्या संख्येने खेळाडूंना व्‍यावसायिक स्‍पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळाला. यंदादेखील त्‍यांचा सहभाग अविस्‍मरणीय ठरेल. - वैभव पाटील. ----------कोट फोटो : H34477 स्‍पर्धेत सहभागाविषयी उत्‍सुक खेळाडूंनी अगदी सरावापासून सामन्‍यांदरम्‍यान उत्‍साह दिसला होता. याच उत्‍साहात यंदाही सहभागी होण्याचा आमचा मानस असून, क्रीडाप्रेमींना मेजवानी मिळेल. - श्रीपाद भट ---कोट फोटो : H34482 गेल्‍यावर्षीच्‍या स्‍पर्धेपेक्षा आणखी एक पाऊल पुढे जाऊन यंदा स्‍पर्धेचे आयोजन असेल असा विश्‍वास वाटतो. स्‍पर्धेत सहभागाविषयी उत्‍सुक असून, क्रीडाप्रेमींनी आवर्जून सामन्‍यांचा थरार पाहण्यासाठी उपस्‍थित राहावे. - प्रिन्‍सी लांबा. ---------कोट फोटो : H34483 किक्रेट असोसिएशनतर्फे नेहमीच खेळाडूंसाठी विविध उपक्रम, स्‍पर्धा आयोजित करण्याचा मानस असतो. ''सकाळ''च्‍या सहकार्याने होत असलेल्‍या या स्‍पर्धेतूनही अनेक चांगले खेळाडू पुढे येतील, असा आमचा विश्‍वास आहे. - चंद्रशेखर दंदणे ---कोट फोटो : H34478 गेल्‍यावर्षी या स्‍पर्धेत खेळाडू म्‍हणून घेतलेल्‍या सहभागाचा अनुभव अतिशय महत्त्वाचा होता. इतरही खेळाडूंना या स्‍पर्धेतून आपला खेळ दाखविण्याची संधी मिळाली. ज्‍यामुळे पुढील कामगिरी करण्यासाठी त्‍यांचा आत्‍मविश्‍वास उंचावला. - आर्य बच्‍छाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

MSRTC strike Diwali: ऐन दिवाळीत 'एसटी'चा संप! कर्मचाऱ्यांनी दिली राज्यव्यापी आंदोलनाची हाक

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा! किनीतील आंदोलनामुळे कोगनोळीत ट्रकच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

कोणाकडे तरी आकर्षित होऊन... वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी का केलं दुसरं लग्न? आता सांगितलं कारण, म्हणाले-

SCROLL FOR NEXT