These pictures show the condition of water in Savargaon-Gangawane Lake before April and in mid-September esakal
नाशिक

SAKAL Relief Fund: सावरगाव- गंगावणे तलावात साठले 1 कोटी 40 लाख लिटर पाणी! गाळ काढल्याने तलावाची क्षमता वाढली

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Relief Fund :  तालुक्यातील सावरगाव गंगावणे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक क्षमता वाढावी म्हणून तलावातील गाळ काढण्यात आला.

यामुळे या तलावाची साठवण क्षमता आता १ कोटी ४० लाख लिटर एवढी झाली आहे. या कामासाठी सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ रिलीफ फंडचे सहकार्य लाभले. ग्रामस्थांनीही या उपक्रमासाठी मदत केली. 

तापमान वाढीच्या संकटामुळे जगभर पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे. ओला, कोरडा दुष्काळ आणि अनेकदा अवकाळी पावसामुळे निसर्गचक्राचा वेध घेणे कठीण बनले आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत.

भविष्यात जलसंकट अधिक बिकट बनणार आहे. त्यामुळे हक्काच्या पाण्याचे व्यवस्थित जतन व्हायला हवे, या उद्देशाने सावरगाव गंगावणे येथील तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या उपक्रमासाठी सरपंच लक्ष्मण बेंडकुळे, उपसरपंच अर्चना विजय दोंदे, ग्रामसेवक प्रशांत कानडे, सावरगाव युवा फाऊंडेशनचे अशोक गोतरणे, कॉन्ट्रॅक्टर विष्णू पाटील व कैलास पाटील संजय गोतरणे, तेजस गायकवाड,

भाऊसाहेब गोतरणे, प्रकाश धोंगडे, विजय दोंदे, प्रकाश गोतरणे, विष्णू मोरे, रुपाली मोरे, उषा गोतरणे, पंडीत गायकर, दत्तू गोतरणे, रामनाथ वरघडे, वाळू गुंबाडे, शंकर वाघ, गौतम भालेराव, मच्छिंद्र गोतरणे, विनोद गोतरणे, सतीश मोरे, प्रकाश वि. गोतरणे, संभाजी धोंडगे, भीमा गोतरणे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT