millet esakal
नाशिक

Sakal Special : चालता...बोलता...! बाप रे, बाजरी एवढी महाग..!

किराणा सामान घेण्यासाठी पुरुषांचा सहभाग तसा विरळच असतो. हे सर्व काम गृहलक्ष्मीच करीत असते.

सकाळ वृत्तसेवा

बाप रे, बाजरी एवढी महाग..!

किराणा सामान घेण्यासाठी पुरुषांचा सहभाग तसा विरळच असतो. हे सर्व काम गृहलक्ष्मीच करीत असते. त्यामुळे कोणती वस्तू काय भावाने मिळत आहे, याची नोकरदार पुरुषाला तशी फारशी कल्पना नसते. पत्नी आजारी असल्याने ही वेळ एकावर आली.

तो यादी घेऊन किराणाच्या दुकानात गेला. सामान घेतल्यावर त्याने बिलाची यादी पाहिली असता एक किलो बाजरीचा भाव पाहून तो उडालाच. दुकानदाराला सांगत ‘अहो, बाजरी ४५ रुपये किलो! काही तरी चुकले तुमचे.

नीट पाहा.’ त्यावर दुकानदाराने त्याला ‘तुम्ही कधीतरी येतात ना, तुम्हाला कशाचे भाव काय आहेत तेच माहिती नाही. अहो, पंधरा आणि वीस रुपये दर कधीच संपले, आहेत कुठे? घरी वहिनींना विचारा, त्या सांगतील’ असे सांगताच ओशाळल्यागत त्याने बिल चुकते केले.

()

चप्पलचा जावईशोध

जावई कधी सासुरवाडीला आला तर त्याच्यासाठी काय करू आणि काय नको, असे सासरच्यांना (सर्वच नव्हे) होऊन जाते. असाच एक लाडाचा जावई फार दिवसांनी सासुरवाडीला जातो. पोहोचायला रात्रच झालेली असल्याने घाईगडबडीत जेवण करून तो झोपी गेला.

सकाळी उठून पाहतो तर काय, एक चप्पल गायब झालेली असते. आता चप्पल कोण बरे घेऊन गेले असेल, असा विचार करीत थोडावेळ तो डोकं खाजवतो. मग लक्षात येते, की कुत्र्याने रात्री डाव साधला असेल.

जरा वेळ इकडे-तिकडे शोध घेतल्यावर एका खड्ड्यात ती सापडते. चला बुवा, किमान सासुरवाडीवरून परतताना अनवाणी पायांनी तरी यावे लागले नाही, याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT