Moringa esakal
नाशिक

SAKAL Workshop: निर्यातक्षम शेवगा लागवडीद्वारे वाढवा आर्थिक उत्पन्न; रविवारी नाशिकमध्ये विशेष कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Workshop : शेवगा लागवडीत आधुनिक ट्रेंड येत असून विविध जातींची व्यावसायिक दृष्टीने लागवड करण्याकडे अधिक कल आहे. त्यामुळे शेवगा फक्त पूर्वीसारखे बांधावरील पीक न राहता त्याचे क्वॉलिटी उत्पादन घेऊन देशांतर्गत तसेच परदेशातही शेवगा पाठविला जाऊ लागला आहे. त्यामुळे शेवगा पिकाची शेती चांगले आर्थिक उत्पन्न देणारी ठरू लागली आहे.

अशा या किफायतशीर तसेच कमी पाण्यातील शेवगा पिकाच्या निर्यातक्षम उत्पादनाबाबत आणि निर्यात संधींविषयी सखोल मार्गदर्शन करणारी एकदिवसीय कार्यशाळा रविवारी (ता.२१) सकाळ- ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे नाशिक येथील सातपूर सकाळ कार्यालयात आयोजिली आहे. (SAKAL Workshop Increase Economic Income through Exportable Moringa Cultivation Special workshop in Nashik on Sunday)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेवगा शेती फायदेशीर काः

- कमी पाण्यात शेवग्याचे उत्पादन

- शेवग्याचा पाला, शेंगा, प्रत्येक भाग उपयोगी

- दररोजच्या आहारात अतिशय फायदेशीर

- निर्यातीला भरपूर वाव

सोलापूर येथील निर्यातक्षम शेवगा उत्पादक प्रगतशील शेतकरी इमरान मुलानी हे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाने शेवग्याचे चांगले उत्पादन घेत असून आर्थिक उत्पन्न वाढविले आहे.

कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी इ.विषयांवर मार्गदर्शन होईल.

प्रतिव्यक्ती बाराशे रुपये शुल्क आहे. आगाऊ नावनोंदणी आवश्यक.

कार्यशाळेचे ठिकाणः सकाळ कार्यालय, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड, नाशिक, वेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ५, नाव नोंदणीसाठी संपर्क : ९२८४७ ७४३६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT