नाशिक

साक्रीत न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप (सुधारित )

CD
दोन कॉलम 02774 साक्री ः विविध मागण्यांसाठी संप करताना दुय्यम न्यायालयीन कर्मचारी. साक्रीत विविध मागण्यांसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप साक्री, ता. १८ : राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या संपात साक्री येथील दिवाणी न्यायालयातील कर्मचारी सहभागी झाले. होणार आहेत. मंगळवार (ता. १७) सुरू झालेल्या या संपामुळे न्यायालयातील कामकाजावरही परिणाम होणार आहे. ‘समान काम, समान वेतन’ या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. राज्यातील सुमारे ३४ हजार कर्मचारी या संपात सहभागी होणार झाले आहेत. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना २००६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली असून, तीच वेतनश्रेणी दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शेट्टी आयोगाच्या शिफारशी राज्य शासनाने लागू केलेल्या नसल्याचा मुद्दाही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून कामकाज केले. दुय्यम न्यायालयांत कर्मचारी कमी असून, उपलब्ध कर्मचाऱ्यांवर त्याचा ताण पडत असून, अनेक न्यायालयांमध्ये पदे रिक्त आहेत. संगणकावर काम करण्यासोबतच मॅन्युअल पद्धतीनेही नोंदी व कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर दुहेरी कामाचा भार पडत आहे. कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त तसेच सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात उपस्थित राहून कामकाजाचा निपटारा करावा लागत असल्याची व्यथा कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. संपात योगेंद्र शिरसाठ, माधवी चिंचोलीकर, श्वेता मोरे, नितीन बोरसे यासह न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप-शिवसेना कार्यालयांवर म्हाडाचा हातोडा; कारवाईवरून पदाधिकाऱ्यांचा संताप, नेमकं काय घडलं?

Instagram Algorithm Update India : इन्स्टाग्रामवर आता अश्लील आणि हिंसक कंटेंट दिसणार नाही? मेटाचा भारतात मोठा निर्णय

Panchganga Sugar Factory : पंचगंगा शुगरकडून ३३०० रुपयांची पहिली उचल घोषित; टप्प्याटप्प्याने ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार; इतर कारखानदारांनी भूमिका न घेतल्याने शेतकरी आक्रमक

Latest Marathi News Live Update : वाघोली परिसरात चार पिस्तुलांसह काडतुसे जप्त

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात नववा राष्ट्रीय निसर्गोपचार दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT