नाशिक

दुष्काळग्रस्तांसाठी ३६ लाखांची मदत

CD
पान-४ सेकंड मेन -- फोटो क्रमांक : 35309 साक्री : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत ३६ लाख १८ हजार ९३२ रुपयांचे योगदान दिल्याचे कागदपत्रे गटशिक्षणाधिकारी कविता मेखे यांच्याकडे सुपूर्द करताना पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी. -- शिक्षण विभागाची दुष्काळग्रस्तांसाठी ३६ लाखांची मदत -- साक्री शिक्षण विभागाचा पुढाकार; जिल्ह्यात सर्वाधिक निधी संकलनाचा मान -- सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १८ : सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत साक्री पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत तब्बल ३६ लाख १८ हजार ९३२ रुपये जमा केले. तालुक्यातील एक हजार १५८ शिक्षक व २६ केंद्रप्रमुखांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या भरीव योगदानामुळे जिल्ह्यात सर्वाधिक निधी संकलित करणारा विभाग म्हणून साक्री शिक्षण विभागाचा मान उंचावला आहे. - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला साक्री तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आपले एक दिवसाचे वेतन या निधीसाठी दिले असून, त्यामुळे दुष्काळग्रस्त नागरिकांना मदत होणार आहे. - सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव केवळ ज्ञानदानाचे कार्य न करता समाजावर आलेल्या संकटात मदतीचा हात पुढे करत साक्री शिक्षण विभागाने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी गटशिक्षणाधिकारी कविता मेखे, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक तसेच विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. साक्री शिक्षण विभागाने घालून दिलेला हा आदर्श निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी ठरला असून, जिल्ह्यातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lift Rules 2026 : १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही; राज्यात नवे कडक नियम लागू, उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द!

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Latest Marathi News Live Update : शायना एनसीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबई प्रेस क्लब बाहेर निदर्शनं

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

Success Story: आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढलं; भावासाठी बहिणींनी शेतात केली मजुरी; लेकाने UPSC मध्ये मिळवली 239 वी रँक!

SCROLL FOR NEXT