नाशिक

साक्रीत दोघांचा बुडून मृत्यू

CD
काळू अहिरे कृष्णा चाळसे --- साक्रीत दोघांचा बुडून मृत्यू --- साक्री तालुक्यात कान, पांझरा नदीतील घटना सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २६ : तालुक्यातील दातर्ती येथे नदीपात्रात बुडून एका ५४ वर्षीय व्यक्तीचा, तर साक्री शहराजवळील सुमंगल मंगल कार्यालयामागील बाजूस असलेल्या नकट्या बंधाऱ्यात पोहताना दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दातर्ती येथील काळू पोलाद अहिरे (वय ५४) रविवारी (ता. २५) पांझरा नदीत मासेमारीसाठी गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते नदीपात्रात बुडाले. कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बोरकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत साक्रीतील कालिका बँगल्सचे संचालक निशांत चाळसे यांचा मुलगा कृष्णा निशांत चाळसे (वय १६) याचा कान नदीपात्रात असलेल्या नकट्या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. कृष्णा साक्रीतील इंग्लिश स्कूलमध्ये दहावीत शिकत होता. सध्या सहामाही परीक्षा सुरू असून, पेपर संपल्यानंतर कृष्णा काही मित्रांसह पिंपळनेर रस्त्यावरील सुमंगल कार्यालयामागील नकट्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला असल्याची माहिती मिळाली. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. उपस्थितांनी त्याला पाण्याबाहेर काढून साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉ. दिनेश बोरकर यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. कृष्णाचा मृत्यू झाल्याने चाळसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, साक्री शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT