धुळे : टुडे पान ४ साठी.. मेन
---
फोटो क्रमांक : 31943
साक्री : जिल्हा परिषद सेस फंड योजनेच्या सोडतीत पात्र ठरलेल्या शेतकरी लाभार्थ्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना जिल्हा कृषी विकास अधिकारी भास्कर जाधव. शेजारी गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांच्यासह अधिकारी.
---
तालुक्यातील ५२८ शेतकरी लाभार्थ्यांची निवड
साक्री पंचायत समितीत कृषी योजनांसाठी लॉटरी पद्धत; शेतकऱ्यांमध्ये समाधान
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ११ : जिल्हा परिषद सेस फंड योजना २०२६-२७ अंतर्गत विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या तीन हजार ५९८ अर्जांमधून उपलब्ध उद्दिष्टानुसार तालुक्यातील ५२८ लाभार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली. साक्री पंचायत समितीच्या सभागृहात नुकत्याच पार पडलेल्या या सोडत प्रक्रियेमुळे निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंचायत समिती सभागृहात सकाळी अकराला सुरू झालेली ही सोडत प्रक्रिया दुपारी पावणेपाचपर्यंत म्हणजेच सुमारे पाच तासांहून अधिक चालली. जिल्हा कृषी विकास अधिकारी भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेत, तसेच गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, सहायक गटविकास अधिकारी मोनाली खेमनार, कृषी अधिकारी राजेंद्र सावळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. अध्यक्ष जाधव व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपस्थित शेतकरी लाभार्थ्यांनी प्रतीक्षा यादीसंदर्भात केलेल्या सूचनांचा विचार करून कृषी विस्ताराधिकारी डी. डी. चौरे आणि चेतन शिरसाट यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. सोडत पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या लाभार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. पारदर्शक सोडत प्रक्रियेमुळे उपस्थित शेतकरी लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा कृषी विकास अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी सोनवणे, सहायक गटविकास अधिकारी खेमनार, कृषी अधिकारी सावळे, कृषी विस्ताराधिकारी चौरे, सी. झेड. शिरसाट, सहायक प्रशासकीय अधिकारी व्ही. एस. माळचे, प्रशासन अधिकारी हेमंत सूर्यवंशी, उज्ज्वल भामरे यांच्यासह कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कृषी तांत्रिक सहायक श्यामराव आर. पावरा, शाहरुख पिंजारी, अजय सोनवणे, संदीप सूर्यवंशी, शेखर पवार यांनी सहकार्य केले. कृषी विस्ताराधिकारी चौरे यांनी आभार मानले.
---
१४-१
चौकट
लॉटरी पद्धतीचा अवलंब
विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या उद्दिष्टापेक्षा अर्जांची संख्या अधिक असल्याने लाभार्थी निवडीसाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला. यात नियमानुसार दिव्यांगांसाठी पाच टक्के आणि महिलांसाठी ३० टक्के आरक्षण ठेवून इतर सर्व लाभार्थ्यांच्या निवडीसाठी सोडत काढण्यात आली. चिठ्ठ्या काढण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्वा, जानवी आणि सविता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत या सोडत प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.