नाशिक

साक्रीत महसूल लोकअदालत

CD
धुळे : टुडे पान ४ साठी... महसूल लोकअदालतीत चार प्रकरणांचा निपटारा साक्रीत सामंजस्याने वाद मिटल्याने पक्षकारांना मिळाला दिलासा सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. ५ : महसूल विभागातील प्रलंबित वाद परस्पर सामोपचाराने मिटवून नागरिकांना जलद न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ अंतर्गत साक्री तहसील कार्यालयात मंगळवारी (ता. ३) विशेष लोकअदालत झाली. या लोकअदालतीत विविध प्रकरणांवर चर्चा होऊन चार प्रकरणे तडजोडीतून कायमस्वरूपी निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले. शासनाच्या महसूल व वन विभागाने १४ ऑगस्टला निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. निवासी नायब तहसीलदार किरण कोठावदे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सुनावणीत महसुली दावे, रस्ते, वहिवाटीचे प्रश्न तसेच विविध अर्धन्यायिक प्रकरणांवर प्रामुख्याने चर्चा झाली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि मध्यस्थीमुळे दोन्ही बाजूंनी परस्पर सहमती दर्शवली. पक्षकारांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे चार प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड घडवून आणण्यात आली, ज्यामुळे ही प्रकरणे कायमस्वरूपी निकाली निघाली. या लोकअदालतीमुळे संबंधित नागरिकांचा न्यायालयाच्या चकरा मारण्यात जाणारा बहुमूल्य वेळ आणि आर्थिक खर्च वाचण्यास मदत झाली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

SCROLL FOR NEXT