नाशिक

साक्री बाजार समितीत सचिव-सभापती संघर्ष (सुधारित )

CD
धुळे ः टुडे ३ साठी, ॲंकर -- साक्री बाजार समितीत सचिव- सभापतींमध्ये संघर्ष! - प्रोसिडिंग घरी नेल्याचा सचिवांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रारी अर्ज दाखल सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २८ : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत सचिव आणि सभापतींमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, शासकीय कामकाजात अडथळा आणणे, मासिक सभेचे अधिकृत इतिवृत्त (प्रोसिडिंग) परस्पर घरी नेणे, सचिवांच्या केबिनचे कुलूप बदलणे आणि सीसीटीव्हीचे पासवर्ड बदलून यंत्रणा बंद केल्याचा गंभीर आरोप सचिव भूषण बच्छाव यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी साक्री पोलिस ठाण्यात सभापती ऋतुराज ठाकरे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे. - सचिव बच्छाव यांच्या तक्रारीनुसार २१ ऑक्टोबरला कार्यालयीन कामकाज सुरू असताना पिंपळनेर येथील नियोजित व्यापारी संकुलाच्या बांधकामासंदर्भात आर्किटेक्ट किशोर पाटील यांच्या नावाचा ठराव मंजूर करून कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी सभापतींकडून दबाव आणण्यात आला. मात्र, यापूर्वीच्या मासिक बैठकीत संबंधित विषय स्थगित ठेवण्यात आल्याने अशी कार्यवाही करणे नियमबाह्य असल्याचे सांगत आपण त्यास नकार दिल्याचे बच्छाव यांनी नमूद केले आहे. या नकारानंतर सचिवपदाचा कार्यभार काढून दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे देण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. - इतिवृत्त कार्यालयाबाहेर दबाव आणि तणावामुळे २१ ऑक्टोबरला सायंकाळी प्रकृती अस्वस्थ झाल्याने आपण कार्यालयातून घरी निघालो, असे बच्छाव यांनी म्हटले आहे. त्याच रात्री सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सभापती व काही कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याचे दिसून आले. दुसऱ्या दिवशी लेखापाल पठाण यांनी कर्मचारी साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्यांसह दिलेल्या पत्रातून सभापतींनी २१ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास मासिक सभेचे अधिकृत इतिवृत्त कार्यालयातून परस्पर घरी नेल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे. - टाळाटाळचा आरोप इतिवृत्त परत मिळवण्यासाठी सभापतींशी वारंवार संपर्क साधण्यात आला. तसेच जिल्हा उपनिबंधक आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल व लेखी पत्राद्वारे याप्रकरणी माहिती देण्यात आली. सभापतींना व्हॉट्सॲप आणि नोंदणीकृत टपालाद्वारेही पत्र पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे. २४ ऑक्टोबरला प्रत्यक्ष भेटून इतिवृत्ताची वही मागितली असता, ती देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप बच्छाव यांनी केला आहे. - कुलूप बदलल्याचा दावा तक्रारीनुसार २४ ऑक्टोबरच्या सायंकाळनंतर बाजार समितीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे पासवर्ड बदलण्यात आले आणि यंत्रणा बंद पाडण्यात आली. त्यानंतर २७ ऑक्टोबरला कार्यालयात गेल्यानंतर सचिवांच्या केबिनचे मूळ कुलूप बदलून नवीन कुलूप लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे नवीन कुलूप सभापतींनीच लावल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. - १४-१ ...चौकट... १४-१ दस्तावेजात फेरफारची भीती मासिक सभेची इतिवृत्त वही हा महत्त्वाचा आणि अधिकृत दस्तऐवज असून, तो अनधिकृतपणे बाहेर असल्यामुळे त्यात फेरफार होण्याची किंवा पुरावा नष्ट होण्याची दाट शक्यता असल्याची भीती सचिवांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणणे, धमकी देणे, अधिकृत दस्तऐवज बळकावणे व संबंधित अन्य बाबींची सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवावा आणि तातडीने इतिवृत्त हस्तगत करावे, अशी आक्रमक मागणी सचिव बच्छाव यांनी केली आहे. -- १४-१ ...कोट... १४-१ बाजार समितीच्या सचिवांकडून करण्यात आलेले आरोप निराधार असून, आगामी काळात यावर सविस्तर खुलासा करणार आहोत. सध्या यावर अधिक भाष्य करणार नाही. - ऋतुराज ठाकरे, सभापती, बाजार समिती, साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

मतदार यादीत नाव असताना फॉर्म ६ कशाला? SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

SCROLL FOR NEXT