नाशिक

बाजार समितीच्या सचिवाचा मनमानी कारभाराबाबत सभापतींचा खुलासा

CD
साक्री बाजार समितीच्या सचिवांची पदावनती सभापती ठाकरे यांचा मनमानी कारभाराबाबत खुलासा सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. ३ : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीत २४ ऑक्टोबरला उपस्थित संचालकानी सचिव भूषण कैलास बच्छाव यांना सचिव पदावरून पदावनत केले आहे. याविषयी तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी देखील सचिव श्री. बच्छाव यांना कमी करण्याचे पत्र समितीला दिले आहे. शिवाय बाजार समितीच्या निर्णयाविरोधात काम करीत असल्याचे लक्षात आल्यावर ही कारवाई केल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ऋतूराज विजयकुमार ठाकरे यांनी दिली. तशा आशयाचे पत्र त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. बाजार समितीच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या प्रश्नांच्या निरसनासाठी सभापती श्री. ठाकरे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे खुलासा केला आहे. या वेळी सभापती श्री. ठाकरे यांच्यासह संचालक दीपक साळुंखे, जितेंद्र बिरारीस, किरण कोठवदे, वसंत पवार, दिनकर बागूल, भास्कर पवार, ओंकार राऊत, शाईराम अहिरे, जिजाबाई साबळे उपस्थित होते. ४ जून २०२५ ला श्री. ठाकरे सभापती झाले आहेत. सचिव नेहमी राजकीय दबावात बाजार समितीच्या निर्णयाविरोधात काम करीत होते. यापूर्वी सचिव श्री. बच्छाव यांच्याविरुध्द माथाडी सभा इतिवृत्त २४ एप्रिलच्या सभेत जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात झालेल्या सभेच्या इतिवृत्तात श्री. बच्छाव यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबत ताशेरे ओढले आहेत. संचालक मंडळास कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासकीय कामकाजात कोणताही बदल झाला नसल्याने संचालक मंडळाने २४ ऑक्टोबरच्या तातडीच्या विशेष सभेत त्यांना सचिव पदावरुन वरिष्ठ लिपीकपदी पदावनत केले आहे. तसा ठराव मंजूर झाला असल्याचे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT