नाशिक

साक्री तहसील मदत

CD
धुळे : टुडे पान ३ साठी... --- दुष्काळग्रस्तांसाठी कर्मचाऱ्यांची एक दिवसाच्या वेतनाची मदत साक्री तहसील कार्यालयाची संवेदनशीलता सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १४ : राज्यात यंदा उद्‍भवलेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट ओढवले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत साक्री तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे उदाहरण दिले आहे. साक्री तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनामधून एक दिवसाचे वेतन स्वेच्छेने कपात केले आहे. याद्वारे जमा झालेली दोन लाख ७३ हजार ७८३ एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली. अन्नदाता शेतकरी संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, या भावनेतून साक्री तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मदतकार्यात सहभाग नोंदविला. गोळा करण्यात आलेल्या मदतीचा धनादेश व विहित नमुन्यातील देणगीदारांची यादी नियमानुसार जिल्हाधिकारी कार्यालय तथा मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सादर करण्यात आली आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे आणि सामाजिक जाणिवेचे तालुक्यात कौतुक होत असून, या मदतीमुळे दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतकार्यास नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा, कारण काय? नेमकं काय घडलं?

IND vs PAK : वीरेंद्र सेहवागचा लेक भिडला... आर्यवीरने पाकिस्तानची झोप उडवली! ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वादळी खेळी

India-US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी? करारातील कोणते मुद्दे शिल्लक आहेत? एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

ला इलाहा इल्लल्लाह! सुनेच्या प्रचारसभेत भाजप नेत्याचं कलमा पठण; ७ वेळचे आमदार, विरोधकांची टीका

Latest Marathi News Live Update: हिंगोलीच्या वसमत शहराची तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी तलावात सोडले कालव्याचे पाणी

SCROLL FOR NEXT