Crime News
Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : शर्ट चोरल्याच्या कारणावरून सेल्समनला बेदम मारहाण! मालकासह बाऊंसरवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ठक्कर डोमनजीक काही दिवसांपूर्वी दिमाखात सुरू झालेल्या ‘मुहूर्त’ शोरुममधील सेल्समनला शर्ट चोरल्याच्या कारणावरून मालकासह बाऊंसरने अमानूषपणे बेदम मारहाण केली. याप्रकरणी मुहूर्त मॉलचा मालक रितेश जैन, विनीत राजपाल यांच्यासह बाउन्सर अभिषेक सिंग आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधीत सेल्समनवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, घटनेच्या दोन दिवसांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. (salesman brutally beaten for stealing shirt case filed against bouncer with owner of muhurat showroom Nashik Crime News)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

विशाल सुधाकर वाहुलकर असे जखमी सेल्समनचे नाव आहे. वाहुलकर याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो मुहूर्त मॉलमध्ये सेल्समन म्हणून काम करीत होता. गेल्या सोमवारी (ता. २६) त्याने शोरुममधील शर्ट चोरल्याच्या कारणावरून मॉलचा मालक रितेश जैन, विनित राजपाल यांच्यासह बाऊंसर अभिषेक सिंग व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली.

तसेच, त्यानंतर त्यास एका फ्लॅटवर नेले आणि त्या ठिकाणीही मारहाण करून डांबून ठेवले. गेल्या मंगळवारी (ता. २७) रात्री त्याची सुटका करण्यात आली. वाहुलकर घरी पोचल्यानंतर त्याने आपबिती कुटूंबियांना सांगितली.

त्यास तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनीही दोन दिवसांपासून दखल घेतली नाही. मात्र, गुरुवारी (ता. २९) त्याचा जबाब पोलिसांनी घेत त्यानुसार, गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT