Vaccination esakal
नाशिक

Vaccination Drive : नाशिक जिल्ह्यात लाळ खुरकूत लसीकरण मोहीम पुर्ववत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे थंडावलेली लाळ खुरकूत लसीकरण मोहीम पुर्ववत सुरू झाली आहे. या मोहिमेंतंर्गत नाशिक जिल्ह्यातील पशुधनासाठी १० लाख ४ हजार सातशे लसमात्रा प्राप्त झाल्या असून जिल्ह्यातील पशुपालकांनी आपल्याकडील सर्व गायी, म्हशी, बैले, रेडे, तीन महिन्यांवरील वासरे/पारडे यांना लसीकरण करून घेत आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या सहकार्याने संपूर्ण भारतात लाळ खुरकूत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. गेल्या आठवड्यात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. तेव्हा हे लसीकरण रखडले होते. मात्र, आता संप मागे घेतला गेल्याने लसीकरण पुर्ववत सुरु झाले आहे.जिल्ह्यात एकूण गाय वर्गीय व म्हैस वर्गीय पशुधन संख्या ११ लाख १६ हजार २८४ एवढी आहे.

जिल्ह्यातील गो/म्हैसवर्गीय पशुधनाचे विषाणुजन्य लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी लसमात्रा पशुवैद्यकीय संस्था स्तरावर वाटप करण्यात आलेल्या आहेत. हा आजार पशूंसाठी मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवतो, तोंडात/पायात जखमा, ताप, गर्भपात, लहान वासरात मरतूक, उत्पादनात प्रचंड घट इ. परिणाम दृष्य स्वरूपात दिसतो. यामुळे पशूंचे व पर्यायाने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

लसीकरण थंड वेळेत करणे फायदेशीर असल्याने सर्व पशुपालकांनी याकरिता सजग राहून आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण करून घेण्यात येत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात ही मोहीम राबविली जात असून पशू पालकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ.गर्जे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT