A team of Sadhan Group going to 19 centers in Dindori taluka to deliver textbooks by tempo. esakal
नाशिक

Samagra Shiksha Abhiyan: दिंडोरी तालुक्यात मिळणार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके अन् गणवेश!

सकाळ वृत्तसेवा

Samagra Shiksha Abhiyan : समग्र शिक्षा अभियानांतर्गत दिंडोरी तालुक्यात नवीन पाठ्यपुस्तके पोहचविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून पहिल्याच दिवशी तालुक्यातील एकुण ४५ हजार ३०० विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके तसेच २४ हजार ३६७ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी दिली आहे. (Samagra Shiksha Abhiyan Students will get free books and uniform in Dindori taluka nashik news)

तालुक्यातील ९ बीट व १९ केंद्रातंतर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या २१२ प्राथमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित मराठी माध्यमाच्या ६१ प्राथमिक व माध्यमिक शाळा, १९ शासकीय व खासगी आश्रमशाळा अशा एकुण २९२ शाळांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण १९ केंद्र प्रमुखांद्वारे करण्यात आले.

तालुक्यात एकुण १ लाख ८१ हजार पाठयपुस्तके विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतील. दुसरी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमातील मराठीसह दहा विविध माध्यमांची आणि एकात्म‍िक व द्व‍िभाषिक पद्धतीची पुस्तके नव्याने तयार करण्यात आली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या तालुक्यातील एकुण १२ हजार ६७४ सर्व मुलींना तसेच अनुसूचित जातीचे ७४६ मुले, अनुसुचित जमातीचे १० हजार ४८९ मुले आणि बीपीएल (द्रारीद्रये रेषेखालील) संवर्गातील ४५८ अशा ११ हजार ६९३ मुले व १२ हजार ६७४ मुली अशा एकुण २४ हजार ३६७ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे.

त्यासाठी प्रती गणवेश तीनशे रूपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी प्रति विद्यार्थी सहाशे रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन पाठय पुस्तके व गणवेश विद्यार्थ्यांना गावातील सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या हस्ते वितरित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT