पान-१ ॲंकर
YEO26B27119
कोपरगाव : निधी वितरणाचे पत्र राष्ट्रीय सहकार विकास निगमचे रिजनल डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांना देताना.
-------------
समता पतसंस्थेला ‘एनसीडीसी’कडून १०० कोटींचा निधी
गुणवत्तापूर्ण कामकाजाची केंद्र शासनाकडून दखल; सोनेतारण कर्जासाठी निधीचा उपयोग
----------------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१२ : भारतातील सहकारी संस्थांच्या व्यवसायवाढीसाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना निधी उपलब्ध करून देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्या माध्यमातून समता नागरी सहकारी पतसंस्थेला १०० कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. त्याबबातचे पत्र राष्ट्रीय सहकार विकास निगम, पुणेचे विभागीय संचालक गिरीराज अग्निहोत्री यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे यांच्याकडे संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
------------
समता पतसंस्थेने गेल्या ४० वर्षांत केलेली गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढ तसेच महाराष्ट्रातील इतर सहकारी पतसंस्थांना दिलेले मार्गदर्शन यामुळे ‘समता’ला मिळालेला हा निधी इतर सहकारी संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरेल, असे गिरीराज अग्निहोत्री यांनी सांगितले. समताचा आदर्श घेऊन इतर पतसंस्थांनीही गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करावेत आणि देशभरात सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. संचालक संदीप कोयटे म्हणाले,‘ या निधीचा विशेषतः सोनेतारण कर्ज वाटपासाठी उपयोग केला जाणार आहे. उपाध्यक्ष अरविंद पटेल म्हणाले, समताची कठोर थकबाकी वसुली, सोनेतारण कर्जवाटपात झालेली लक्षणीय वाढ आणि ग्राहकांचा विश्वास यामुळे हा निधी संस्थेला प्राप्त झाला आहे. त्याचा उपयोग संस्थेच्या प्रगतीसाठी केला जाईल.
समताने राबविलेली समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम, वसुली पॅटर्न, कॉल सेंटर, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, समता सहकार उद्योग मंदिर आणि व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली याबाबत गिरीराज अग्निहोत्री यांनी माहिती घेतली. अशा प्रकारचे उपक्रम इतर सहकारी संस्थांनीही राबवावेत यासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगम प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी या निधीचा उपयोग सहकाराचे नाव उज्ज्वल करण्याबरोबरच इतर सहकारी संस्थांच्या वाढीसाठीही केला जाईल असे सांगितले.
काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्था लवकरच महाराष्ट्रात सहकार बास्केटच्या माध्यमातून मिनी ॲमेझॉन उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा उपक्रम राष्ट्रीय सहकार विकास निगमामार्फत संपूर्ण भारतभर राबविण्यात येणार असल्याचे गिरीराज अग्निहोत्री यांनी सांगितले. पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. कोयटे, उपाध्यक्ष अरविंद पटेल, ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा, कचरू मोकळ, संचालक संदीप कोयटे, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, संचालिका श्वेता अजमेरा, अक्षरा पटेल, स्वाती कोयटे, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे, जनरल मॅनेजर सचिन भट्टड आदी उपस्थित होते.
------------------
कोट
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना कमी व्याजदरात सोनेतारण कर्ज उपलब्ध करून देत आहे. खासगी फायनान्स कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबण्यास यामुळे मदत होत आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
-ओमप्रकाश कोयटे, अध्यक्ष, समता पतसंस्था.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.