नाशिक

समीर भुजबळाचा वाढदिवसाचा उत्सव टाळून दुष्काळग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य येवल्यात आरोग्य शिबिरे,दिव्यांगाना साहित्याचे वाटप,विद्यार्थ्यांसाठी वह्या-पुस्तकांचे संकलन

CD
पान-३-- फोटो घेणे समीर भुजबळ --------------- समीर भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांना मदत येवल्यात आरोग्य शिबिरे, दिव्यांगाना साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांसाठी वह्या-पुस्तकांचे संकलन --------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ६ : मतदारसंघात निर्माण झालेली दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार समीर भुजबळ यांचा (ता.९) रोजी असलेला वाढदिवस यंदा कोणताही मोठा उत्सव न करता सामाजिक बांधिलकी जपत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी उपयोगात यावा, या उद्देशाने संपूर्ण मतदारसंघात मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शुभेच्छांच्या माध्यमातून वह्या, पुस्तके व शालेय साहित्य संकलित करून गरजू विद्यार्थ्यांना वितरित तसेच दिव्यांग बांधवांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संपर्क कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक सध्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत वाढदिवस हा संकटग्रस्तांच्या मदतीचा, गरजूंच्या आधाराचा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा दिवस ठरावा, या भावनेतून यंदा दोन्ही वाढदिवसांच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व गरजू कुटुंबांना शक्य ती मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाढदिवसाचा आनंद समाजाच्या उपयोगी यावा या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरणार आहे. वाढदिवसानिमित्त ९ पासून येवल्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू होईल. सर्व गटात शिबिरांमध्ये नागरिकांची आवश्यक आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व आवश्यक उपचार करण्यात येणार आहेत. शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्यांना आवश्यक शस्त्रक्रिया करून देण्यासाठीही पुढाकार घेण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांना काठी, फोल्डिंग बेड, व्हीलचेअर, वॉकर यासह आवश्यक उपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त नागरिकांनी हार, पुष्पगुच्छ किंवा शालऐवजी वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या साहित्याचे येवला मतदारसंघातील गरीब, गरजू व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी जमा होणाऱ्या पुस्तकांचा उपयोग अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्रांसाठी करण्यात येणार आहे. समीर भुजबळ हे शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी दोनपर्यंत येवला संपर्क कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध असतील. दरवर्षी वाढदिवसानिमित्त होणारा उत्सव यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर टाळून ‘शुभेच्छा समाजासाठी, मदत दुष्काळग्रस्तांसाठी, आरोग्यसेवा गरजूंसाठी आणि साहित्य विद्यार्थ्यांसाठी’ या भावनेतून वाढदिवस सामाजिक उपक्रमांना समर्पित करण्यात येणार आहेत. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT