Riverbed surrounded by bushes, grass etc esakal
नाशिक

Pollution: मानवी हस्तक्षेपामुळे दारणेचे पावित्र्य धोक्यात! औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याने जैवविविधता नष्ट

सकाळ वृत्तसेवा

Pollution : इगतपुरी तालुक्यासह उत्तर महाराष्ट्र, मुंबई, मराठवाड्याची जीवनवाहिनी ठरलेल्या, अनेक खोऱ्यांची सुपीकता, शेतीसह औद्योगिक, लष्कर अन्य सिंचनाच्या सुखसोयी अर्थात विकासाचा राजमार्ग ज्या दारणा नदीवर अवलंबून आहे, नदीवरील मानवी हस्तक्षेपामुळे दारणेचे पात्र उथळ व पावित्र्य धोक्यात आले आहे.

त्याकडे जलसंपदा प्रशासनाचे दुर्लक्ष व नागरिकांचा देखील हलगर्जीपणा दिसून येत आहे. (Sanctity of Darna in danger due to human intervention Wastewater from industrial estates destroys biodiversity at mundhegaon padali nashik news)

नदी पात्रात औद्योगिक वसाहतीमधील व शहर तसेच ग्रामीण भागातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी, कचरा, प्लॅस्टिक, बांधकामातील साहित्य, कचरा, हानिकारक रसायने, कीटकनाशके आदी मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे.

यातून पाण्यातील मत्स्य व जैविक संसाधने नष्ट होत आहे. दारणेच्या प्रवाहास सद्य:स्थितीत गटार गंगेचे स्वरूप प्राप्त होऊन मानवी रोगराईचे गोदाम म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तालुक्यातील ८० टक्के पाणीपुरवठा योजना दारणेच्या पाण्यावर अवलंबून आहे.

सोबत देवळालीच्या लष्करासाठी देखील पाणीसाठा थेट दारणा समूहातून केला जातो. दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी दारणा नदीपात्रात दिवसागणिक वाढत आहे.

तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना फिल्टर प्लांट नसल्याने व पश्चिम स्थित धरणांतून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात येते, त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांनी घेरले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नदीपात्रात टाकण्यात येणारा मलबा व डोंगर माथ्यावरील सिंचन खंदकाद्वारे वाहून आलेला गाळसाठा यामुळे नदीपात्र उथळ झाले आहे.

नदीचा बदललेला प्रवाह धोकादायक

सिंचन क्षमतेचा विचार केल्यास पाणीसाठा क्षमता नदीपात्राची दिवसागणिक कमी झाली आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांनी नदी पात्रात केलेले अतिक्रमण, खोदकामामुळे बदलण्यात आलेला नदीचा बदललेला प्रवाह धोकादायक ठरत आहे.

जलसंपदा विभागाने नागरिकांचे हित जोपासतानाच दारणा नदी स्वच्छता,प्रक्रियांचा वानवा असलेल्या प्रवाहाला रोखणे पुढील पिढीच्या उत्कर्षासाठी काळाची गरज आहे.

प्रशासनाला साथ अथवा आपल्या विकासाला चालना देणाऱ्या दारणेकरिता सेवाभावी संस्था व नागरिकांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT