Nashik Accident News esakal
नाशिक

Nashik Accident News : वाळूच्या डंपरने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिटी सेंटर मॉलजवळ वाळूच्या डंपरने धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडलेल्या वृद्धाच्या डोक्यावरूनच डंपरचे चाक गेले. या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला असून, त्यांची पत्नीही गंभीर जखमी आहे. याप्रकरणी गंगापूर रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दिलीप हनुमंत भावे (७६, रा. कामटवाडा, नाशिक) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भावे व त्यांच्या पत्नी रश्‍मी भावे दुचाकीवरून (एमएच- १५- एफपी- ३२३४) सिटी सेंटर मॉल सिग्नलकडून गंगापूर रोडच्या दिशेने निघाले. या वेळी सिग्नल ओलांडून सिटी सेंटर मॉलसमोर ते आले असता, पाठीमागून आलेल्या वाळूच्या डंपरने (एमएच- १५- डीके- ४८४७) भावे यांच्या दुचाकीला धडक दिली. (Sand dumper crushed old man riding a bike Nashik News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्यामुळे भावे दांपत्य दुचाकीवरून रस्त्यावर पडले. या वेळी भावे डंपरच्या चाकाखाली सापडले आणि चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. तर रश्‍मी भावे याही गंभीररीत्या जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

भावे सैन्यातील निवृत्त असून, त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, सिटी सेंटर मॉल रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूपाची होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृतरीत्या वाहने उभी केले जात असल्याने या रोडवर सायंकाळी आणि वीकेंडला वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होते. याच कोंडीमुळे शनिवारी एका वृद्धाचा बळी घेतला आहे. वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाईची अंमलबजावणी होत नसल्यानेच या मार्गावर वाहतूक कोंडी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT