Sunita Deore esakal
नाशिक

Success Story : सांगवीच्या सुनीताची पोलिस दलात निवड! प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत मिळवले यश

सकाळ वृत्तसेवा

Success Story : पोलिस, सैन्यदलात भरती होण्यासाठी लाखो मुले मुली तयारी करतात. अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. असेच यश सांगवी (ता. देवळा) येथील सुनीता अशोक देवरे यांनी हिने संपादित केले आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुनीता हिने पोलिस भरतीचे सर्व निकष पूर्ण करत पोलिस दलात भरती होत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या यशामुळे तिच्यावर ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Sangvi Sunita selection in police force Success achieved by struggling against adverse conditions nashik news)

सांगवी (ता..देवळा) येथील अशोक देवरे यांची मुलगी सुनीता हिची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे. सुनीताचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा सांगवी येथे तर माध्यमिक शिक्षण हे कुंभार्डे येथे झाले.

अशोक देवरे यांची घरची परिस्थिती प्रतिकूल असताना देखील मुलींनी शिक्षण पूर्ण करत सरकारी नोकरी करावी असे स्वप्न उराशी बाळगले. यासाठी त्यांनी सुनीताला पोलिस भरतीसाठी पाठवले. मुलीने पोलिस भरतीची तयारी करणे तितके सोपे नव्हते.

सुनीता हिने देखील वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करत प्रयत्न सुरु केले सर्व अडचणींवर मात करून यशाला कवेत घेत वडिलांचे स्वप्न सुनीता हिने पूर्ण केले. मुलगी सुनीता हिने खाकी वर्दी घालून सेवा देण्याचा निर्धार केला.

सुरवातीला सुनीताची स्टाफ सिलेक्शन मध्ये निवड झाली मात्र कागदपत्रांचा अडथळा आल्यामुळे तिथली संधी हुकली होती. मात्र तिने जिद्द सोडली नाही. सुनीता हिचे यश ग्रामीण मुलींना निश्चितच प्रेरणादायी आहे. सुनीताला पोलिस भरतीसाठी आर्य करिअर ॲकॅडमीचे संचालक विक्रांत भामरे यांचे मार्गदर्शन लाभले.

"स्वतः वरील विश्वास, अपार कष्टाची तयारी आणि आई-वडिलांची साथ यामुळेच मी यशापर्यंत पोचू शकली." - सुनीता देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये हिटलर बनायचा मॅनेजर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT