नाशिक

महापालिकेसमोर सफाई कामगारांचे धरणे आंदोलन

CD
फोटो : H32640 --------- सफाई कामगारांचे महापालिकेसमोर धरणे सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : वॉटरग्रेस कंपनीने बडतर्फ केलेल्या २०० कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे, सफाई कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कामगारांना मानधनावर सेवेत रुजू करावे या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. १६) महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कामगारांनी म्हटले आहे की, गेल्या ४ वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करत होतो, मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही. महापालिकेविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल करूनही त्याला २०२६ च्या नवीन टेंडर प्रक्रियेत पुन्हा सामावून घेण्यात आले. मालेगाव महापालिकेने त्याचा ठेका रद्द केला होता. पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. सफाई कंत्राटी ठेक्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून घनकचरा व्यवस्थापक अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून या प्रकरणाची त्वरित चौकशी करावी. कंत्राटी सफाई ठेका रद्द करावा, गेल्या चार वर्षांपासून कामावर येण्यास मज्जाव केलेल्या २०० कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे. कंत्राटी सफाई ठेका पद्धत बंद करून सर्व कंत्राटी सफाई कामगारांना मानधनावर घेण्यात यावे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला. आंदोलनात धीरेंद्र आहिरे, विशाल आढाव, लतेश सोनवणे, विशाल साळवे, हेमंत काळे, सविता बोडके, असिफ कादरी, मिजान पठाण, संदीप धामणे, स्वाती दोंदे, अमोल जाधव आदी सहभागी झाले होते. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Scheme: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून 5,000 रुपये मिळणार; कसा कराल अर्ज?

US School Shooting: अमेरिकेत प्राथमिक शाळेत गोळीबाराचा थरार; तीन चिमुरड्यांसह चार जणांचा मृत्यू

कपिल देव यांचा Gen Z ला सल्ला; CJP च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान; म्हणाले, युवा पिढी नेहमीच बरोबर नसते...

Sangli DCC Bank Election : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; अर्ज वैध ठरताच केली 'ही' पोस्ट, विरोधकांचे राजकीय डावपेच धुळीला..

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT