फोटो : H34327
-------------------
पात्र व्यक्तींना पुनर्वसन योजनेत समाविष्ट करावे
सफाई कर्मचारी आयोगाचे महापालिकेला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : हाताने मैला साफ करण्याच्या प्रथेच्या निर्मूलनासंदर्भात यापूर्वीच्या सर्वेक्षणात समाविष्ट न झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी नव्याने सर्वेक्षण पूर्ण करावे आणि घोषणापत्र सादर करणाऱ्या पात्र व्यक्तींना पुनर्वसन योजनेत समाविष्ट करावे, अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने महापालिकेला दिल्या.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवि रामू कलोसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. १) महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनिषा खत्री, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती पूनम महाले, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, विभागप्रमुख आणि सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कायमस्वरूपी, अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य व सुरक्षितता या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. ‘नमस्ते’ योजना, सार्वजनिक शौचालयांची स्थिती, निवास व कल्याणकारी योजनांवर चर्चा झाली. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी करून तातडीने लाभ देण्याचे आणि ‘फिक्स पे’ बाबत पुनर्विलोकन करून पात्र कर्मचाऱ्यांना दोन हप्त्यांत लाभ देण्याचे निर्देशही आयोगाने दिले. सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन सदस्य कलोसे यांनी केले.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.