sanjay raut esakal
नाशिक

भाजपला मिळालेलं यश हे मोदींच्या चेहऱ्यामुळेच: संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : देशाच्या पंतप्रधानांनी राजकीय प्रचारात भाग घेऊ नये असं खासदार संजय राऊत यांनी सांगितले. सात वर्षांत भाजपला मिळालेलं यश हे केवळ मोदींच्या चेहऱ्यामुळे हे नाकारू शकत नाही असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकमध्ये म्हणाले. संजय राऊत (mp sanjay raut) हे सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा ते आढावा घेत आहेत.

कोणत्याही पंतप्रधानांनी प्रचारात सहभागी होऊ नये - राऊत

पुढील वर्षाच्या प्रारंभी नाशिक महापालिकेची निवडणूक (Nashik Municipal Election) होणार आहे. निवडणुकीची तयारी सुरू असतानाच उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील पक्षसंघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. चारही जिल्ह्यांतील पक्षसंघटनेतील पदाधिकाऱ्यांशी राऊत चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे, लोकसभानिहाय आढावा घेणार आहेत. बुधवारी (ता. ९) खासदार राऊत यांनी नाशिकमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका (कै.) कल्पना पांडे व (कै.) सत्यभामा गाडेकर यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची भेट घेतली. सायंकाळी पक्षाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. आज (ता. १०) दुपारी धुळे येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शुक्रवारी (ता. ११) नंदुरबार व रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. शनिवारी (ता. १२) जळगावला पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. रविवारी (ता. १३) नाशिक व दिंडोरीतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marco Rubio Warning : पंतप्रधान मोदी-पेजेश्कियान भेटीनंतर अमेरिकेचा भारताला इशारा; इराणसोबत व्यापार केल्यास निर्बंध?

‘परस्पर संमतीने घेतला निर्णय’ बादशाह-ईशा रिखीचं नातं अखेर संपलं; रॅपरने स्वतःच केला मोठा खुलासा!

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज परभणी, धाराशिवमध्ये बंदची हाक

"जरा हुक्का पिके आता हू"; MS Dhoni च्या Video ने खळबळ; रिषभ पंतची अवस्था पाहून नेटकरी संतापले, समोर बिअरचा टीन?

El Nino weather impact : ‘एल निनो’चा धोका वाढला; पुढील ६ महिने अत्यंत महत्त्वाचे, पूर-दुष्काळासह उष्णतेचा इशारा

SCROLL FOR NEXT