शहर टुडे पान-२---जिल्हा पान ४ साठी
------------
मुलांचे फोटो
YEO26B27000
--------
‘संजीवनी’च्या चौघांना आयआयटीमध्ये इंटर्नशिप
--------
देशातील प्रतिभावान विध्यार्थ्यांच्या गटात ‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांचा समावेश
--------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : कोपरगाव येथील संजीवनी युनिव्हर्सिटीच्या चार विद्यार्थ्यांची इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नाॅलाॅजी (आयआयटी) गुवाहाटी, आसाम येथे सहा महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. देशातील विविध नामांकित शैक्षणिक संस्थांमधील प्रतिभावान विद्यार्थ्यांमध्ये संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेचे, संशोधनाभिमुख शिक्षणपद्धतीचे द्योतक आहे.
स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सीएसई) विभागातील दिव्या रावसाहेब वारुळे व रोहन आत्माराम निकम तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स (एआयडीएस) विभागातील जय नीलेश जोबनपुत्रा व तनिष्क सचिन पहाडे यांची या निवड झाली आहे.
दिव्या वारुळे ही आयआयटी गुवाहाटीतील तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली ‘फुल स्टॅक वेब अँड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या विषयावर संशोधन व प्रकल्प कार्य करणार आहेत. रोहम निकम, जय जोबनपुत्रा आणि तनिष्क पहाडे हे ‘एआय, मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन अँड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट’ या अत्याधुनिक विषयांवर संशोधनात्मक कार्य करणार आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी प्रा. ज्योर्तिमई कलिता यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसह अर्ज आयआयटीकडे पाठविले. त्यात प्रामुख्याने एआय स्किल्स, काॅम्प्युटर व्हिजन, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, अशा विविध बाबींचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संजीवनी शिक्षण संकुलाचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष अमित कोल्हे, व्हॉईस चॅन्सेलर डाॅ. ए. जी. ठाकूर, डीन डाॅ. कविथा राणी, विभागप्रमुख डाॅ. महेंद्र गवळी, डाॅ. किशोर जाधव यांनी अभिनंदन केले.
-------------
कोट
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोच्च तांत्रिक संस्थांमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणे ही संजीवनीसाठी अभिमानाची बाब आहे. यापूर्वीही संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी रशिया, फिलिपाईन्स, कॅनडा, यूके, जपान, तैवान आदी विद्यापीठांमध्ये संपूर्ण स्काॅलरशिपवर २३० पेक्षा अधिक इंटरर्नशिप पूर्ण केल्या आहेत.
-अमित कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी युनिव्हर्सिटी
--------------