condition of Nirhale to Asha Pir Gad road leading to Saint Nivrittinath's palakhi
condition of Nirhale to Asha Pir Gad road leading to Saint Nivrittinath's palakhi  esakal
नाशिक

Sant Nivruttinath Palakhi : निवृत्तीनाथ पालखीची जिल्हा सरहद्दीवरील वाट खड्ड्यांतून...

सकाळ वृत्तसेवा

Sant Nivruttinath Palakhi : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारीसाठी मार्गक्रमण करत असून शनिवारी दि.18 अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. (sant nivruttinath palakhi Demand for repair of road from Road from Marhal to Ashapir foothills as Palkhi Marg nashik news)

पालखी मार्गावर जिल्हा सरहद्दीवरील सिन्नर तालुक्यातील मऱ्हळ ते आशापिर गडाच्या पायथ्यापर्यंत चा रस्ता खड्डेमय बनला असून या खड्ड्यात ठेचा खात पालखीसोबतच्या हजारो वारकऱ्यांना रस्ता पार करावा लागणार आहे.

नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मऱ्हळ ते आशापिर पायथ्यापर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी निऱ्हाळे येथील बुवाजी बाबा संस्थानचे अध्यक्ष महंत बबन महाराज सांगळे, सरपंच मनीषा यादव, उपसरपंच विष्णू सांगळे यांनी केली आहे.

खंबाळे येथील मुक्काम आटोपल्यावर मऱ्हळ, निऱ्हाळे मार्गे आशापीर गडावरून जात निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगर जिल्ह्यातील पारेगाव येथे मुक्कामासाठी थांबते. मऱ्हळ-निऱ्हाळे-घोटेवाडी रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती होत नसल्याने वाट लागली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निऱ्हाळे गावातून आशापीर गडाकडे पालखी जाणारा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी याच मार्गावरून नाशिक जिल्हा ओलांडून अहमदनगर जिल्ह्यात जाणार आहे. जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारी रस्त्याची ही दुरावस्था वारकऱ्यांसाठी त्रासदायक असून जिल्हा प्रशासनाने नियोजन आराखड्यात निवृत्तीनाथ पालखी जाणाऱ्या मार्गांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.

मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वारकऱ्यांना ठेचा खात मार्गक्रमण करावे लागत असल्याचा आरोप महंत बबन महाराज सांगळे, सरपंच मनीषा यादव, उपसरपंच विष्णू सांगळे यांनी केला आहे. संत निवृत्तीनाथांच्या पालखी मार्गावरील निऱ्हाळे ते आशापीर गड पायथ्यापर्यंतच्या रस्त्याचे पक्के बांधकाम करावे व वारकऱ्यांची वाट सुकर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT