suspension esakal
नाशिक

Nashik News: मांडवड आणि गिरणानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष जाधव निलंबित

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यातील मांडवड आणि गिरणानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष जाधव यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तसेच सेवा वर्तणुकीचा भंग केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे. (Santhosh Jadhav gram Sevak of Mandwad and Girnanagar Gram Panchayat suspended Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संतोष जाधव यांना मांडवड ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीसाठी उपलब्ध करून न देणे, लेखापरीक्षणासाठी अभिलेख उपलब्ध करून न देणे, अनधिकृतरीत्या गैरहजर राहणे, शासनाच्या निरनिराळ्या योजनांतून रकमेचा अपहार करणे,

कामकाजाची माहिती संकेतस्थळावर अपडेट न करणे, पंचायत समितीचे मासिक, पाक्षिक सभेस उपस्थित न राहणे, कामकाजात हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर करणे, कामकाजाचे अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर न करणे,

खात्यावर पैसे नसताना पंचायत समिती कार्यालयास धनादेश देऊन फसवणूक करणे यासह आर्थिक अपहाराच्या आणखी दोन प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे.

संतोष जाधव हे अकरा प्रकरणांमध्ये दोषी आढळल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी त्यांना निलंबित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीचा लाजीरवाणा विक्रम; रोहित शर्मा, सौरव गांगुली झाले असतील खूश, कारण...

Pre-Diwali Beauty: दिवाळीपूर्वी घरच्या घरी गोल्ड फेशियल केल्यास चेहरा दिसेल चमकदार

Latest Marathi News Live Update : सभांना गर्दी मिळते पण मत नाही : राज ठाकरे

IND vs AUS 1st ODI Live: भारतीय संघाला 'तोट्या'त टाकणारा निर्णय! षटकांची संख्या झाली कमी, ऑस्ट्रेलियाचा फायदा...

SCROLL FOR NEXT