पान-३
------------
VNI26B13176
सप्तशृंगगड ः आदिमाया सप्तशृंगीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पंचामृत महापूजा व घटस्थापना प्रसंगी उपस्थित राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे आदी.
--------
VNI26B13180
सप्तशृंगगड ः आदिमायेच्या सुवर्णालंकराचे ट्रस्टकार्यालयात विधीवत पूजन करुन काढण्यात आलेली सवाद्य मिरवणूक
--------------
VNI26B13181
आदिमायेच्या मंदिर सभामंडपात भाविकांची असलेली गर्दी.
----
VNI26B13178
सप्तशृंगगड ः भक्तांगण हॉलसमोरील यज्ञमंडपात घटस्थापना करताना महिला भाविक
-------------
VNI26B13177
सप्तशृंगगड ः रोपवेद्वारे मंदिरात जाण्यासाठी भाविकांची लागलेली रिग.
----------------------------------
श्री सप्तशृंगी मातेच्या जयघोषात घटस्थापना
--------------
गडावर पहिल्याचा दिवशी साठ हजारावर भाविकांकडून दर्शन ः चैतन्याचा जागर
------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.११ : ‘आई राजा उदो उदो’, ‘श्री सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषात, मंत्रोच्चारांच्या निनादात आणि पारंपरिक वाद्यांच्या मंगलध्वनीत आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर रविवारी (ता.११) शारदीय नवरात्रोत्सवाचा दिमाखदार प्रारंभ झाला. पहिली माळ व रविवारची सुटी आणि घटस्थापनेचा योग साधत तब्बल ५० ते ६० हजार भाविकांनी आदिमायेचे दर्शन घेतले. देवीच्या पारंपरिक आभूषणांची सवाद्य मिरवणूक, मान्यवरांच्या हस्ते पंचामृत महापूजा आणि विधिवत घटस्थापनेने गडावर भक्ती, शक्ती व चैतन्याचा जागर सुरू झाला.
-------------
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येपासूनच देवीची ज्योत घेऊन गडावर येणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. श्री भगवती मंदिरात जयघोष, घंटानाद आणि मंत्रोच्चारांनी वातावरण भक्तिमय झाले होते. सकाळी सातला ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने यांनी सपत्नीक देवीच्या पारंपरिक आभूषणांचे विधिवत पूजन केले. पुरोहितांना वर्णी-दक्षिणा देण्यात आल्यानंतर विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयातून देवीच्या आभूषणांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळी आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. संबळ, हलगी, ताशा आणि टाळांच्या गजरात तसेच देवीच्या नामघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. अलंकारांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
१६-१
अन् विधिवत घटस्थापना
राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती आणि नाशिकचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सपत्नीक पंचामृत महापूजा केली. पारंपरिक विधी, वेदमंत्रांचे पठण आणि पुरोहितांच्या मंत्रोच्चारांत महापूजा झाली. त्यानंतर श्री भगवती मंदिरात विधिवत घटस्थापना करण्यात आली. या धार्मिक विधींनी शारदीय नवरात्रोत्सवाला अधिकृत सुरुवात झाली.
१६-१
शैलपुत्रीच्या उपासनेने सुरुवात
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री स्वरूपाची पूजा केली जाते. दृढता, पावित्र्य आणि निसर्गाशी एकरूपतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या शैलपुत्रीच्या उपासनेतून आध्यात्मिक साधनेचा प्रारंभ होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. घटस्थापनेद्वारे देवीचे आवाहन करून नऊ दिवसांच्या शक्तिउपासनेला प्रारंभ केला जातो. सप्तशृंगी गडावरही या परंपरेनुसार धार्मिक विधी पार पडले.
कळवणचे तहसीलदार तथा विश्वस्त रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, उपजिल्हाधिकारी बंडू कापसे, देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके, राजेश गवळी जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, यशवंत देशमुख यांच्यासह ट्रस्टचे विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.
-----------------
१६-१
नऊ दिवस आदिमायेचा जागर
पहिल्याच दिवशी झालेली भाविकांची मोठी गर्दी, पारंपरिक धार्मिक विधींचा उत्साह आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेले तीर्थक्षेत्र यामुळे सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला. आगामी नऊ दिवसांत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, गडावर भक्ती आणि शक्तीच्या आराधनेचा जागर सुरू राहणार आहे.
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.