Saptashranggad esakal
नाशिक

चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगड सज्ज; यंदा विक्रमी गर्दीची शक्यता

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास अर्थात, रामनवमीस रविवार (ता. १०)पासून प्रारंभ होत असून, यात्रोत्सवासाठी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, मंडळे तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

व्यावसायिकांची सजली दुकाने

दोन वर्षानंतर आदिमाया सप्तश्रृंगीचा वर्षाभरातील वेगवेगळ्या उत्सवांपैकी एक प्रमुख उत्सव असलेल्या चैत्रोत्सवास रविवारपासून सुरवात होत आहे. १६ एप्रिलपर्यंत सुरू राहणाऱ्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होतील. उत्सवकाळात रोज सकाळी सातला भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे. रामनवमीनिमित्त मंदिर पायऱ्यांवरील रामटप्पा येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव होणार आहे. शुक्रवारी (चवदस) (ता. १५) यात्रोत्सवातील महत्त्वाचा दिवस असून, या दिवशी खानदेशवासीयांसह कसमा भागातील लाखो पदयात्रेकरू गडावर दाखल होणार आहेत. याच दिवशी साडेतीनला न्यासाच्या कार्यालयात आदिमायेच्या गड शिखरावर पडकविण्यात येणाऱ्या कीर्तीध्वजाचे पूजन न्यासातर्फे करण्यात येऊन मानकरी दरेगावचे गवळीपाटील यांचेकडे सुपुर्त करण्यात येईल. त्यानंतर कीर्तीध्वजाची सवाद्य मिरवणूक निघेल. रात्री बाराला मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकणार आहे. चैत्रोत्सवाची सांगता रविवारी (ता. १७) सकाळी सातला प्रक्षालय पंचामृत महापुजा व दुपारी ११ ते ३ या वेळेत महाप्रसाद वाटपाने होणार आहे. यात्रोत्सवाच्या दृष्टीने गडावरील प्रसाद नारळ, पूजेचे साहित्य, हॉटेल व इतर व्यावसायिकांची दुकाने सजली आहेत.

ST महामंडळानेही केले नियोजन

सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायतही सोयी-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज आहे. यात्रेत प्लस्टीक बंदी आहे. भाविकांची तहान ट्रस्ट, ग्रामपंचायत व प्रशासन पाण्याच्या टँकरने भागवणार आहे. पुरेसा पोलिस बंदोबस्त असणार आहे. यात्रा कालावधीत नांदुरी ते सप्तश्रृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद असून, नांदुरी ते सप्तशृंगगड यादरम्यान तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव विभागातून बस सोडण्याबाबत राज्य परिवहन विभागाने नियोजन केले आहे. दरम्यान, ट्रस्टकडून दरवर्षाप्रमाणे भाविकांचा विमा काढण्यात आला असून, यात्रोत्सवात महाप्रसादालयात भाविकांना मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे-मार्केट परिसरात तणाव; मंडळांमध्ये जोरदार भांडण

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

"नागरिकांच्या जीवाची किंमत आहे का ?" टेस्ला कार घेतल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईकांना अभिनेत्याचा सवाल, "एवढा पैसा कुठून आला ?"

SCROLL FOR NEXT