नाशिक

सप्तशृंगी गडावर अतिक्रमणांवर धडक कारवाई रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; नवरात्रोत्सव, कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी संयुक्त मोहीम

CD
09686 फोटो ओळी- चांदणी चौकातील अतिक्रमण काढताना कर्मचारी. सप्तशृंगगडावरील अतिक्रमण हटविले रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; नवरात्रोत्सव, कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मोहीम कळवण, ता. ८ : सप्तशृंगगडावर सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत आणि वन विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. नवरात्रोत्सवातील गर्दीचे नियोजन आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे गडावरील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. गडावरील चांदनी चौक, भवानी चौक, म्हामांदेवी चौक आणि दत्त मंदिर परिसरात आठ दिवसांपासून अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू आहे. वाहतुकीला व भाविकांच्या ये-जा करण्यास अडथळा ठरणारी अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. रस्ते, पादचारी मार्ग आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यावर भर दिला जात आहे. नवरात्रोत्सवात अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होते. भाविकांना सुरक्षितपणे मंदिराकडे जाता यावे, वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दीचे नियोजन सुलभ व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही सार्वजनिक मार्ग मोकळे ठेवण्याच्या नियोजनाला गती देण्यात येत आहे. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिक्रमणे हटविल्याने संबंधित चौक व मार्गांवरील जागा मोकळी होत असून, भाविकांच्या ये-जा करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध होत आहे. मोहिमेदरम्यान तहसीलदार रोहिदास वारूळे, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय देवरे आणि महसूल अधिकारी उपस्थित होते. कोट- गडावर दर्शनासाठी येताना अरुंद रस्ते आणि गर्दीमुळे चालणेही कठीण होत होते. अतिक्रमणे हटविल्याने मार्ग मोकळे झाले आहेत. प्रशासनाने हे मार्ग कायम मोकळे ठेवावेत. जेणेकरून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सुरक्षितपणे दर्शनासाठी जाता येईल. स्वामी देशमुख, भविक ........... कोट... भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ते व सार्वजनिक जागा मोकळ्या राहणे आवश्यक आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी ग्रामस्थ व व्यावासियक संबंधित विभागांना सहकार्य करीत आहे. गडावरील वाहतूक आणि पादचारी मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रदीप देशमुख, पोलिस निरीक्षक, कळवण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT