During Chaitrotsav, 56 foreign guests from 23 countries singing bhajans in the temple of Shri Bhagwati.  esakal
नाशिक

Saptashrungi Devi Chaitrotsava 2023 : चैत्रोत्सवामध्ये 23 देशांतील 56 विदेशी पाहुणेही सहभागी

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठ व नारीशक्ती या चित्ररथाने देशासह जगभराचे लक्ष वेधून घेतल्याने स्वयंभू आद्यशक्ती पीठ असलेल्या आदिमाया सप्तशृंगीचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला आहे.

त्यामुळेच की काय चैत्रोत्सव पर्वात यंदा भगवतीच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी २३ देशांतील पर्यटक, भाविक गडावर आले असून आदिमायेच्या भक्तिरसात चिंब झाले. (Saptashrungi Devi Chitrotsava 2023 56 foreign guests from 23 countries participated nashik news)

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंगी देवीचा महिमा सातासमुद्रापार पोहोचला आहे. तो पाहून गडावर सुरू असलेल्या चैत्रोत्सवात हे विदेशी पर्यटक सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत भाषेत भगवतीची आराधना केली.

अनिवासी भारतीय पर्यटकांना देखील भगवतीच्या महात्म्याची ओढ दिसून आली. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रांस, टोकियो, इटली यूएस, न्यूझीलंड, ग्रीस, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोलंड आदी देशातील या भाविकांनी आदिमायेच्या मंदिरात मराठी मध्ये जोगवा, गणेश अथर्वशीर्ष तसेच मराठी भजन गात सगळ्यांचेच लक्ष केले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

यात त्यांचे 'चलो बुलावा आया हैं, माताने बुलाया हैं', 'जोर से बोलो जय माता दी' या देवीचे भजन, गायलेला गोंधळ आणि जोगवा ऐकून भाविक मंत्रमुग्ध झाले. हे भाविक परमपूज्य निर्मला देवी सहज योग ध्यानकेंद्राच्या माध्यमातून गडावर आले होते. अनेक भाविकांनी त्यांनी गायलेली भजन व जयघोष मोबाईलमध्ये शूट केला. ट्रस्टतर्फे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

चैत्रोत्सवनिमित्त गडावर देवीचे माहेर असलेल्या खानदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक गडावर दाखल होतात. वर्षातून चैत्र व नवरात्र हे दोन यात्रोत्सव पार पडतात. नवरात्रात मुंबई परिसरातील व गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील भाविक, पर्यटकांची लाखोंच्या संख्येने गर्दी असते. चैत्रोत्सवात खानदेशातील भाविक पायी, अनवाणी गडावर दाखल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadevi Elephant Latest Video : 'महादेवी'ला मठाने भीक गोळा करायला ठेवलं', पेटाचा गंभीर आरोप; राजू शेट्टींचेही उत्तर

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM मोदी आज 20वा हप्ता पाठवणार; हप्ता आला नाही तर काय कराल?

Bank Loan: कर्ज देण्यापूर्वी बँका 10 वेळा विचार करणार; RBI संपूर्ण व्यवस्थाच बदलणार, सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

सुरू झाला फ्लिपकार्टचा Freedom Sale; स्मार्टफोनवर मिळतोय 60% पर्यंत बंपर डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर..

पत्नी-सासूची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; घराच्या मागे खड्ड्यात मृतदेह पुरून वर केळीचे लावले झाड, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

SCROLL FOR NEXT