Assistant Collector Vishal Narwade and Gram Panchayat Member Kalpana Barde present during the Panchamrit Mahapuja of the fourth garland of Adimaye's Sharadiya Navratri festival on Wednesday. esakal
नाशिक

Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगी गडावर भाविकांची रीघ; आजपासून होणार वाढ

सकाळ वृत्तसेवा

Saptashrungi Devi Gad : अध्यात्माबरोबरच निसर्गसौंदर्याने नटलेल्या सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सवात आदिमायेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची रीघ कायम असून, बुधवारी (ता. १८) २५ हजारांवर भाविकांनी हजेरी लावली.

दरम्यान, नवरात्रोत्सवाचे पुढील पाच दिवस धार्मिक विधींसाठी महत्त्वाचे मानले जात असल्याने गुरुवार (ता. १९)पासून गडावर भाविकांच्या गर्दीत वाढ होणार आहे. (Saptashrungi Devi Gad increase in crowd of devotees at fort from today nashik news)

स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेस सप्तशृंगीदेवीची महापूजा सहाय्यक जिल्हाधिकरी तथा प्रांताधिकारी विशाल नरवडे व ग्रापंचायत सदस्या कल्पना मनोज बर्डे यांनी केली. सकाळी सप्तशृंगीदेवीचा सुवर्णालंकारांनी सााजशृंगार करण्यात आला. त्यामुळे देवीचे रूप अधिकच खुलून दिसत होते.

पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी सातला देवीची महापूजा झाली. भाविक ‘सप्तशृंगीमाता की जय, बोल अंबे माते की जय’चा जयघोष करीत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे १० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टने व्यवस्था केली आहे. या कामी ट्रस्टचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मेहनत घेत आहेत. गुरुवार (ता. १९)पासून गडावर भाविकांची अधिक गर्दी होणार आहे. चक्रपूजा सुरू होत असल्याने भाविकांसाठी गडावर ठिकठिकाणी पूजाविधीचे नियोजन केले आहे.

नवरात्रोत्सवात ट्रस्टतर्फे भाविकांना सकाळी, सायंकाळी मोफत महाप्रसादवाटप करण्यात येत आहे. महाप्रसादात बटाटा भाजी, ऊसळ, वरण, भात, पोळी, बुंदी असतो. ट्रस्टने ६० रुपये देणगी आकारून व्हीआयपी महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. भाविकांना प्रसाद म्हणून दहा रुपयांत मोतीचूरच्या लाडूचे पॉकिट वितरणाची पहिली पायरी, रोपे वे कार्यालय, मंदिर परिसर व परतीच्या मार्गावर, अशा चार ठिकाणी कक्ष स्थापित केले आहेत.

माता शक्तीच्या चौथे रूप म्हणजे माता कुष्मांडादेवीची पूजा केली जाते. देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने विश्वाची निर्मिती केली, असे मानले जाते. कुष्मांडा संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ कुह्मादाचा त्याग करणे, असा होतो. कुष्मांडाची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते व सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.

श्लोक

सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेवच ।

दधाना हस्तेपद्माभ्यो कुष्माण्डा शुभदास्तुमे।

या दैवी शक्तीने जागृत झालेल्या प्रेमाने अनुवंपेने साधकामधील राग, द्वेष आदी फळून जातो. आधीच्या पिढीकडून रागीट स्वभाव आला, तरी तो स्वभाव वितळून जातो, असे ऋषी वेदांतामध्ये सांगतात. तमस आणि राक्षसीवृत्ती नष्ट होते. वाईट, अमंगल, अविचार निघून जातात. ही फक्त प्रेम आणि करुणा देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT