नाशिक

सप्तशृंग गडावर कोजागिरी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता.. सुमारे १४ लिटर तीर्थजलाने भगवतीचा सपत्नीक महाभिषेक; सुवर्णालंकारांनी देवीचे रूप सजले

CD
पान चार ॲंकर ---------- 13370 सप्तशृंग गड : आदिमायेचे कोजागिरी पौर्णिमे निमित्त मंदीर गाभाऱ्यात करण्यात आलेल्या फुलमाळांच्या आकर्षक सजावटीतील आश्वासक तेजोमय रुप. सप्तशृंग गडावर कोजागिरी उत्सवाची सांगता. १४०० लिटर तीर्थजलाने भगवतीचा महाभिषेक; सुवर्णालंकारांनी देवीचे रूप सजले सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २६ : ‘सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते’ या मंत्रघोषाने दुमदुमलेला सप्तशृंग गड, मुखातून अखंड उमटणारा ‘अंबे माता की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’चा जयघोष, कावडधारकांच्या श्रद्धेने भारावलेले वातावरण आणि आदिमाया सप्तशृंगी भगवतीच्या चरणी अर्पण होणाऱ्या तीर्थजलाचा पवित्र सोहळा... अशा भक्तिमय वातावरणात सप्तशृंग गडावरील कोजागिरी पौर्णिमा उत्सव, कावड यात्रा आणि तृतीयपंथीयांच्या छबिना सोहळ्याची सांगता झाली. सप्तशृंग गडावर ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव पार पडला. त्यानंतर २५ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत कोजागिरी पौर्णिमा उत्सव आणि कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांनी गडावर हजेरी लावत सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. विविध तीर्थक्षेत्रांवरून कावडींतून आणलेले पवित्र जल देवीच्या अभिषेकासाठी अर्पण करण्याची परंपरा यंदाही श्रद्धापूर्वक पार पडली. ----------- तीर्थजलाने भगवतीचा महाभिषेक रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास विविध तीर्थक्षेत्रांवरून कावडधारकांनी आणलेले तीर्थजल एकत्रित करण्यात आले. या जलाचे संकलन करून सुमारे १४०० लिटर तीर्थजल अभिषेकासाठी उपलब्ध झाले. या पवित्र जलाने श्री भगवतीच्या मूळ मूर्तीवर पंचामृतासह ११ पुरोहितांच्या मंत्रघोषात महाभिषेक करण्यात आला. विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा सहधर्मादाय आयुक्त विवेक सोनूने व तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. विविध ठिकाणांहून आणलेल्या तीर्थजलाचा देवीच्या अभिषेकासाठी झालेला उपयोग हा कावड यात्रेतील प्रमुख धार्मिक विधी ठरला. ------- सुवर्णालंकारांनी सजले देवीचे रूप महापूजेच्या निमित्ताने आदिमाया सप्तशृंगी भगवतीच्या मूर्तीला विविध सुवर्ण आणि रौप्य अलंकारांनी सजविण्यात आले होते. सोन्याचे मंगळसूत्र, वज्रटिक, पुतळ्यांचे गाठले, मयूर हार, मोहनमाळ, कर्णफुले, नथ आणि पाऊल, तसेच चांदीचा कमरपट्टा व मुकुट अशा अलंकारांनी देवीचे रूप अधिक तेजस्वी भासत होते. धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि अलंकारांनी नटलेल्या भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम होती. पहाटेपर्यंत दर्शनासाठी रांगा कोजागिरी पौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडावर भाविकांची मोठी वर्दळ होती. सोमवारी (ता.२६) पहाटेपासून गर्दीचा ओघ हळूहळू कमी होत गेला. सकाळी सातपर्यंत भाविकांची संख्या घटली. सोमवारी सकाळी देवीची पंचामृत महापूजा, तर दुपारी बाराला नैवेद्य आरती नित्यनियमाने पार पडली. यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या मुख्य धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT