नाशिक

गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत

CD
32083 सारंगखेडा : गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करताना रवींद्र बागुल, उपनिरिक्षक, किरण बारे, प्रवीण लोहार आदी. गहाळ झालेले मोबाईल मूळ मालकांना परत सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. १३ : सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत देण्यात सारंगखेडा पोलिसांना यश आले आहे. सीईआयआर पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत पाच मोबाईल शोधून मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. सारंगखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते. या मोबाईलबाबत सीईआयआर पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. या प्रयत्नांतून चंद्रकांत शिवाजी पाटील (रा. शेल्टी, ता. शहादा), जितेंद्र विजयसिंग गिरासे (रा. बिलाडी बामखेडा, ता. शहादा), योगेश देवरे (रा. मंदाणे, ता. शहादा), विठ्ठल उत्तम चित्ते (रा. ससदे, ता. शहादा) आणि किरण भास्करराव कापडणीस (रा. लोहनार, ता. देवळा) यांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल पुन्हा देण्यात आले. पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय अधिकारी गुलाबराव पाटील तसेच निरीक्षक राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रवीण लोहार यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. मोबाईल गहाळ झाल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि सीईआयआर पोर्टलवर आवश्यक माहिती भरून तक्रार करावी. - रवींद्र बागुल, साहाय्यक पोलिस निरिक्षक, सारंगखेडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Latest Marathi News Live Update : पुण्यात पाण्याचं संकट! गुरुवारपासून १० टक्के कपात, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

Akola News : नवरात्रीत अकोला पोलिसांकडून नागरिकांना दिलासा! २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल परत; ५२६ मोबाईल, ५० वाहने, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश

SCROLL FOR NEXT