Traffic Management esakal
नाशिक

Ram Navami 2023 : सरदार चौक ते काळाराम मंदिर रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद!

नरेश हाळणोर

नाशिक : येत्या गुरुवारी (ता. ३०) रामनवमी आहे. यानिमित्ताने पंचवटीतील काळाराम मंदिरात श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने गुरूवारी सरदार चौक ते काळाराम मंदीर हा रस्ता सर्वच वाहनांसाठी बंद राहणार असल्याचे आदेश पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिले. (Sardar Chowk to Kalaram Mandir road closed for traffic tomorrow Ram Navami 2023 nashik news)

पंचवटीतील काळाराम मंदिरात श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव श्रीरामनवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यासाठी शहरातीलच नव्हे तर राज्य-परराज्यातून भाविकांची गर्दी होत असते.

तर, सरदार चौक ते काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा या दरम्यान असलेला रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रामनवमीच्या दिवशी या मार्गावर भाविकांची गर्दी व वाहतूक यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवण्याची शक्यता आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

त्यामुळे येत्या गुरुवारी (ता. ३०) सकाळी सात वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत सरदार चौक ते काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा या रस्त्यावर वाहतुकीला प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. या रस्त्यावरून हातगाड्या, बैलगाड्या या सर्व प्रकाराच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.

सदरील बंदी आदेश पोलीस दलातील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत, असेही उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिलेल्या अधिसूचनेतून स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT