नाशिक

‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ स्थळी सरदार पटेलांना मानवंदना

CD
NSK26H33850 एकतानगर : येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे सरदार पटेल यांना येणाऱ्या १५१ व्या जयंतीनिमित्त सामूहिक मानवंदना देण्यात आली, त्याप्रसंगी सहभागी पदाधिकारी, समाजबांधव व मान्यवर. --------- ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ स्थळी सरदार पटेलांना मानवंदना उपशीर्षक महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे उपक्रम सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : लेवा पाटीदार समाजातर्फे स्टॅच्यू ऑफ युनिटी, एकतानगर या ठिकाणी समाजाचा मानबिंदू सरदार पटेल यांना जयंतीनिमित्त सामूहिक सलामी आणि मानवंदना अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे प्रथमच आयोजित ऐतिहासिक हा कार्यक्रम नुकताच उत्साहात झाला. सोबतच लेवा पाटीदार समाजाची कुलदेवी पावागढ वासिनी कालिका मातेचे सामूहिक दर्शनही घेण्यात आले. नाशिक येथील नोबेल टुरिझमचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या प्रथेनुसार नजिकच्या काळात दिवंगत झालेल्या ज्ञात अज्ञात समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल आणि आई बहिणाई यांचे प्रतिमापूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, नोबेल टुरिझमचे संचालक सचिन भोळे, सचिव दिलीप नाफडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद महाजन, पुरुषोत्तम पिंपळे, खानदेश विभाग समुपदेशन समिती प्रमुख पांडुरंग काळे (बंडूदादा), खानदेश सेना अध्यक्ष सुहास बोंडे, भरूच येथील महासंघाचे गुजरात विभाग उपाध्यक्ष प्रवीण झांबरे, अहमदाबाद मंडळाचे अध्यक्ष बी.के. पाटील, महासंघाचे उपाध्यक्ष विकास वारके, आदी उपस्थित होते. दिलीप नाफडे यांनी प्रास्ताविक, प्रणिता झोपे व डॉ. मिलिंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. साधना लोखंडे यांच्या वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. चौकट ‘सरदार गीत’ सादर नंदुरबार येथील सरदार गाथा सादर करणारे हेमंत पाटील यांनी तयार केलेली प्रार्थना सादर करण्यात आली. त्यावेळी सरदार पटेलांची आरती करण्यात आली. शेवटी कवी, महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ मिलिंद पाटील यांनी त्यांचे स्वरचित ‘सरदार गीत’ नीता वराडे, साधना लोखंडे, प्रीती इंगळे, पुष्पा पाटील, प्रणिता झोपे आणि डॉ. प्रा. किरण चौधरी यांच्या सहयोगाने सादर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

SCROLL FOR NEXT