नाशिक

अखंड भारताच्या निर्मितीत सरदार पटेलांचे मोलाचे योगदान

CD
फोटो : NSK26H34205 सारंगखेडा : सरदार पटेल जयंतीनिमित प्रतिमेस अभिवादन करताना जयपालसिंह रावल, रवींद्र बागूल, पृथ्वीराजसिंह रावल, रमण पाटील, अंबालाल पाटील, रमेश पाटील, भिक्कन पाटील, रवींद्र पाटील आदी. ------------------- अखंड देशाच्या निर्मितीत पटेलांचे मोलाचे योगदान : जयपालसिंह रावल सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. १ : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे अखंड भारताच्या निर्मितीत व देशाची एकात्मता कायम राखण्यात मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी राष्ट्रासाठी केलेला त्याग अतुलनीय आहे. युवा पिढीने देशाच्या सरदार पटेल यांच्यासारख्या राष्ट्रपुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून विकसीत भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष तथा माजी जि. प. उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केले. सारंगखेडा (ता. शहादा) येथील श्री दत्त मंदिर कार्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागूल, सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, विविध कार्यकारी सोसायटी संघाचे माजी उपाध्यक्ष रमण पाटील, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष अंबालाल पाटील, उपाध्यक्ष रविंद्र पाटील, सचिव भिक्कन पाटील यांच्यासह नितीन पाटील, गोवर्धन पाटील, गिरधर पाटील, अशोक पाटील, डॉ. नरोत्तम पाटील, धरमदास पाटील, विश्राम पाटील, रमेश पाटील, नगिन पाटील, छोटुलाल पाटील, प्रदीप कोळी, जाकीर खाटीक, भैय्या सोनार आदी उपस्थित होते. जयपालसिंह रावल म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर नेतृत्वामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील ५६५ संस्थानांचे भारतात विलीनीकरण अखंड भारताची निर्मिती शक्य झाली. सरदार पटेल यांचे नेतृत्व नसते, तर देशाचे अनेक तुकडे झाले असते. हैदराबादसारख्या संस्थानांमध्ये निजामशाही कायम राहण्याची शक्यता होती. त्यामुळे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेत आणि अखंडतेत सरदार पटेल यांचे योगदान ऐतिहासिक व अतुलनीय आहे. आर. बी. राजपूत यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम आगळे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमार यांची खुर्ची जाणार, तुरुंगवारीही ठरलेली! रामलीला मैदानातून राहुल गांधींचा थेट इशारा...

RINKU SINGH: ठरलं तर मग! रिंकू सिंहच्या लग्नाची तारीख पक्की, बहीण नेहा सिंहने दिली मोठी अपडेट; शॉपिंगही झाली सुरू, जाणून घ्या सविस्तर

बांदेकरांच्या सुनेची झी मराठीच्या नव्या मालिकेत एन्ट्री! हर्षद अतकरी साकारणार 'अभ्या', तारीख आणि वेळ जाहीर

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : "भाजप कधीही पुन्हा सत्तेत येणार नाही!" अखिलेश यादव यांचा दावा; उत्तर प्रदेशातील मतचोरीवरून भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT