नाशिक

सरदार पटेल जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन

CD
ॲंकर NSK26H34089 जळगाव : महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी. ....... सरदार पटेल जयंतीनिमित्त मनपात अभिवादन महापौर, आमदारांसह पदाधिकाऱ्यांकडून प्रतिमापूजन; राष्ट्रीय एकात्मतेची शपथ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे शनिवारी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापालिका प्रांगणातील सरदार पटेल यांच्या पुतळ्यास आमदार सुरेश भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे यांच्यासह भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, सुनील खडके, डॉ. विश्वनाथ खडके, नरेंद्र पाटील, सागर सोनवणे, प्रदीप रोटे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, रंजना वानखेडे, वैशाली पाटील, जयश्री पाटील उपस्थित होते. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौकट राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. विविधतेतून एकता जपण्याचा आणि देशाच्या एकात्मतेप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

IND vs NZ, 5th T20I: शेवटचा सामन्यात होणार मोठे प्रयोग? वैभव सूर्यवंशी, कुलदीपला मिळणार Playing XI मध्ये संधी?

Marathi News Live Updates : गोकुळ दूध संघातर्फे उत्पादकांना ११७ कोटींची 'दिवाळी भेट'; अंतिम दूध दर फरक थेट बँक खात्यात जमा

Omer Abdullah: जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला विवाहबंधनात अडकले! जाणून घ्या त्यांच्या पत्नीचे नाव?

Foreign Deputy PM daughter Bollywood Ambition : "ते नेते माझ्या मागेच लागलेत!"; जगातील 'त्या' बलाढ्य देशाच्या उपपंतप्रधानांच्या मुलीला काम करायचंय बॉलिवूडमध्ये; केंद्रीय मंत्र्यांचा मोठा खुलासा

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

SCROLL FOR NEXT