NSK26H34823 : सरफराज सय्यद
---
गोळीबारातील वरणगावच्या जखमीचा मृत्यू
---
हनीट्रॅप रचून बोलावले अन् हल्ला; नऊ दिवस मृत्यूशी झुंझ अखेर शांत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव/वरणगाव ता. ९ : सोशल मीडियावर फेक प्रोफाईल तयार करून मुक्ताईनगरातील तरुणाला वरणगाव (ता. भुसावळ) येथील पुलाजवळ बोलावून त्याच्यावर लोखंडी रॉड व गावठी पिस्तुलाने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी तरुणावर जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तेथे उपचारादरम्यान सोमवारी (ता. ९) त्याचा मृत्यू झाला. सरफराज सय्यद शाकीर सय्यद (वय २४) असे मृताचे नाव आहे.
मुक्ताईनगरच्या काझीपुऱ्यातील सरफराज सय्यद साकिर सय्यद याच्याशी पूर्वी झालेल्या किरकोळ वादातून बदला घेण्यासाठी संशयितांनी इन्स्टाग्रामवर सुंदर मुलीचे चित्र लावून फेक अकाऊंट तयार केले. सरफराजला जाळ्यात ओढून खोट्या प्रेमाचे आमिष दाखवून १ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास वरणगाव पुलाजवळ बोलविले. फुलगाव उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्यावर सरफराज पोहोचल्यावर पूर्वीपासून दबा धरून असलेल्या दोन संशयितांनी त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. तो खाली कोसळला. नंतर तिसऱ्या व्यक्तीने गावठी पिस्तुलीतून गोळीबार केला. तो मरण पावल्याचे समजून मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला.
नऊ दिवस मृत्यूशी झूंज
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सरफराज शुद्धीवर आल्यानंतर त्याने मदत मागितली. कुटुंबियांना कळताच रुग्णालयात दाखल केले. जळगावच्या खासगी रुग्णालयात जखमी तरुणाला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, नऊ दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या सरफराजचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.
दोन संशयितांना अटक
वरणगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी फेकरी (ता. भुसावळ) येथील भूषण ऊर्फ बिस्ला राजू सावले (वय २०) व सिद्धार्थ रामदास ढिवरे (२७) यांना अटक केली.
पोलिस अधीक्षकांना निवेदन
कुटुंबासह प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवकांनी या प्रकरणी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. सरफराजने सहा-सात संशयितांची नावे व वर्णन सांगितले आहे. त्या सर्व संशयितांना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदन देतेवेळी कॉंग्रेसचे मुफ्ती हारुन नदवी, करीम सालार, फारुख शेख आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.