Sarpanch Parishad claim printing mistake of up sarpanch award after Sakal news nashik news
Sarpanch Parishad claim printing mistake of up sarpanch award after Sakal news nashik news 
नाशिक

Nashik News: चूक लक्षात येताच ‘प्रिंटिंग मिस्टेक’चा दावा; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर सरपंच परिषदेची सारवासारव

प्रमोद दंडगव्हाळ

Nashik News: सरपंच परिषदेने नुकतेच राज्यातील विविध पुरस्कार घोषित केले आहेत; परंतु हे पुरस्कार घोषित करताना त्यांनी चक्क उपसरपंचालाच ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार घोषित केल्याचे ‘सकाळ’ने वृत्तातून निदर्शनास आणताच परिषदेने सारवासारव केली. झालेली चूक लक्षात येताच त्यांनी ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाल्याचे सांगितले.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषद मुंबई येथे काम करीत आहे. सारूळचे उपसरपंच सदानंद नवले यांचे काम लक्षात घेता त्यांना आदर्श सरपंच हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. (Sarpanch Parishad claim printing mistake of up sarpanch award after Sakal news nashik news)

विशेष म्हणजे नवले हे सरपंच नसून, सारूळचे उपसरपंच आहेत. असे असतानाही त्यांना सरपंचपदाचा पुरस्कार कसा देण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला. या संदर्भात ‘सकाळ’ने शनिवारी (ता. २) वृत्त प्रसिद्ध करताच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी लगेच सारवासारव करीत ती ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाल्याचे सांगितले. त्यांना सरपंच नव्हे, तर उपसरपंचपदाचा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगून चूक दुरुस्त केली आहे.

मात्र, असे असले तरी सदर पत्रात उपसरपंचपदाला पुरस्काराचे स्थान दिले आहे, असे कोठे दिसून येत नाही. सदानंद नवले यांनी सांगितले, की माझे काम हे सरपंच ते उपसरपंच या पदापर्यंत आहे. आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा प्रस्ताव मी परिषदेला दिला होता. त्यामुळेच मला हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे मी आता जरी सरपंच नसलो, तरी पूर्वी मात्र मी सारूळचा सरपंच होतो.

पारदर्शक तपासणी आवश्‍यक

वास्तविक पाहता पुरस्कार समितीने पुरस्कारासाठी राज्यातून दहा सरपंचांची नावे घोषित केली आहेत. त्यामुळे सारूळचे सरपंच कोण, त्यांचे कार्य काय, याची माहिती निवड समितीने घेणे आवश्यक होते. समोरच्या व्यक्तीने सरपंचपदाचा दावा करून तर हा पुरस्कार घेतला नाही ना, याची फेरतपासणी करणे आवश्यक होते. तसे न करता उपसरपंचांनाच सरपंचांचा आदर्श पुरस्कार देऊन परिषदेने वरवरच्या कारभाराचे प्रदर्शन केले आहे.

वास्तविक पाहता उपसरपंचांनी पत्र मिळाल्यावर सदर निवड समितीच्या ही बाब लक्षात आणून देणे गरजेचे होते. तसे न करता त्यांनी प्रसारमाध्यमांना सरपंच पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. त्याबाबत सरपंच परिषदेच्या प्रदेशाध्यक्षांना विचारणा केली असता, आमच्याकडून ‘प्रिंटिंग मिस्टेक’ झाल्याचे कबूल करून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT