Mohan Bhagwat Esakal
नाशिक

Mohan Bhagwat : सरसंघचालक भागवत आजपासून 2 दिवस नाशिकमध्ये असणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्राचे द्वितीय (विशेष) वर्ष संघ शिक्षा वर्ग गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात सुरू आहे. या संघ वर्गांसाठी शनिवारपासून (ता.२०) दोन दिवस सरसंघचालक मोहन भागवत नाशिकमध्ये येत आहेत.

ते दोन दिवस या वर्गाला पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षण वर्गात सौराष्ट्र, गुजरात, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, देवगिरी व विदर्भ या प्रांतातून एकूण ४७६ स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित आहेत. (Sarsangchalak mohan Bhagwat will in Nashik for 2 days from today Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरवर्षी देशभरात संघाचे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे तीन सप्ताहाचे प्रशिक्षण वर्ग मे व जून महिन्यात आयोजित केले जातात. या विविध राज्यातील वर्गात शिक्षार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी संघाचे अखिल भारतीय अधिकारी तसेच क्षेत्र व प्रांत स्तरावरील कार्यकर्ते प्रवास करीत असतात.

त्याअंतर्गत नाशिक येथील विशेष द्वितीय वर्षाच्या वर्गात सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या शनिवारी (ता. २०) व रविवारी(ता. २१) पूर्णवेळ उपस्थित राहणार आहे. या दोन दिवसात सरसंघचालक शिक्षार्थ्यांशी चर्चा व संवाद साधणार असून सर्वांना मार्गदर्शनही करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT