coin esakal
नाशिक

सातवाहनकालीन नाण्यांवर मोहाच्या वृक्षाचे चिन्ह

महेंद्र महाजन

नाशिक : जीवनदायिनी गोदावरीमुळे परिसर प्राचीन काळापासूनच निसर्ग सौंदर्याने समृद्ध राहिला आहे. सातवाहन कालखंडात बऱ्याच शिलालेखातून, नाण्यांमधून, हाल सातवाह राजाने लिहिलेल्या ‘गाथा सप्तशती’ मध्ये नाशिक विभागातील निसर्गाचा उल्लेख पाहायला मिळतो. येथील नाणे संग्राहक चेतन राजापूरकर यांच्या संग्रहातील सातवाहनकालीन नाण्यांवर मोहाच्या वृक्षाचे चिन्ह आहे. (Satavahana-coins-Mention-nature-of-Nashik-marathi-news)

गोदावरी नदीच्या किनारी मोहाचे झाडे असल्याचे वर्णन

नाणेवरील निसर्गाचे चिन्हे हे राजांचा निसर्ग संवर्धनासाठी संदेशच असावा, असे दिसून येते. सातवाहन काळातील नाणे कोणत्या विभागातील आहे, हे ओळखण्यासाठी त्या विभागाचे काही खास चिन्ह आहे. नाण्यावरील मोहाचे वृक्ष म्हणजे नाशिकची त्या काळातील ओळख असणार. नाण्यावरील झाडाच्या फांद्याखाली लावलेल्या व त्यावर छोटे बिंदू म्हणजे त्या झाडाचे फूल असावे, हे जाणवते. गोदावरी तीरावरील मोहाच्या झाडाच्या फांद्या फुलांच्या ओझ्याने जमिनीकडे लावल्या आहेत, म्हणून फुले तू हळूहळू ढाळ अशा पद्धतीने नायक हा नायिकेला बोलतोय. तसेच ९६४ व्या श्लोकात देखील नाशिकच्या निसर्गाचा उल्लेख पाहायला मिळतो. गोदावरीतीरी असलेल्या मोहाच्या झाडांच्या फांद्या-फुलांच्या ओझ्याने जमिनीकडे झुकलेल्या आहेत. यावरून हे वृक्ष असे सुचवतात की, हे एक चांगले संकेतस्थान आहे. निसर्गामुळे हे सर्व उत्तम निसर्ग संकेतस्थळ आहे, हे कवी दर्शवत आहे. सातवाहनकालीन नाशिक विभागात मिळून येणाऱ्या नाणेवरील चिन्ह बारकाईने पाहिल्यास त्या वृक्षाच्या फांद्यादेखील खाली लावल्या आहेत. हे वृक्ष म्हणजेच आपले नाशिकचे असलेले एक उत्कृष्ट निसर्गाचा प्रतीक आहे. त्याकाळातील येथील राजांचे तसेच नागरिकांचे निसर्गाविषयी असलेले प्रेम व निसर्ग संवर्धनासाठीचे प्रयत्न बघायला मिळतात, असे राजापूरकर सांगतात.

शेकडो वर्षांपूर्वीच्या मानवाला जे कळाले ते आपल्याला कळू नये, ही शोकांतिका म्हणायला हवी. त्यामुळे अनेक संकट ओढवून घेत आहोत. नाशिकच्या इतिहासाने आणि त्याच्या वेगळेपणाने पावलोपावली आपल्याला निसर्गाजवळ जाण्याचा संदेश दिला आहे. हा संदेश ऐकायचा आणि त्यानुसार अंमलबजावणी करायची की पुन्हा रोगरार्इच्या संकटांना सामोरे जायचे, हे आता आपल्याला ठरवायचे आहे. - चेतन राजापूरकर, नाणे संग्राहक.

Associated Media Ids : NSK21F91554, NSK21F91555

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT