नाशिक

चुलत भावाच्या मृत्यूस कारणी ठरल्याप्रकरणी संशयितास ५ वर्षाचा सक्षम कारावास

CD
पान-३ -------------------- खूनप्रकरणी एकाला पाच वर्षे कारावास सातपूरमधील घटना ः भांडण सोडविण्यास गेलेल्याचा हकनाक बळी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.८ : ब्ल्यूटूथ स्पीकर मागितल्याच्या वादातून सातपूर परिसरात झालेल्या चाकू हल्ल्यात एकाच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि बाराशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सागर तुकाराम शिंगाडे (रा. संतोषी मातानगर, सातपूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. २९ ऑगस्ट २०२० ला रात्री साडेदहाच्या सुमारास सातपूर येथील सुयोग रबर एंटरप्रायझेस कंपनीसमोरील रस्त्यावर ही घटना घडली होती. तक्रारदार किशन जगताप आणि साक्षीदार सनी घुले, किरण साबळे कंपनीसमोरील कट्ट्यावर बसले होते. सागर तुकाराम शिंगाडे ब्ल्यूटूथ स्पीकर घेऊन जात असताना सनी घुले यांनी गाणी वाजविण्यासाठी स्पीकर मागितला. यावरून आरोपीने वाद घालत शिवीगाळ आणि मारहाण केली. तक्रारदाराने विरोध केल्याने दोघांमध्ये झटापट झाली. संशयिताने कमरेला खोचलेला चाकू काढून सनी घुले यांच्यावर वार केला. त्याने वार चुकविल्याने त्यांच्या कपाळाला किरकोळ दुखापत झाली. तक्रारदार किशन जगताप याने चाकू पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उजव्या हाताला आणि कमरेला दुखापत झाली. हे भांडण सोडविण्यासाठी भीमराव शिंगाडे घटनास्थळी आला. आरोपीने केलेला चाकूचा वार भीमराव यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला लागला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सुखदेव काळे यांनी तपास केला. त्यांनी पुरावे संकलित करून आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तक्रारदार, साक्षीदार, पंचांच्या साक्ष आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि बाराशे रुपये दंड केला, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहिले. अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पैरवी अंमलदार मोनिका खरे आणि कोर्ट अंमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनकर खैरनार यांनी खटल्याचा वेळोवेळी पाठपुरावा केला. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajasthan Voter List Discrepancy : 30 लाख मतदारांची नावे गहाळ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वादाच्या भोवऱ्यात, SIR प्रक्रियेनंतर दोन याद्यांमध्ये तफावत

Khadakwasla Dam Latest Water Level : खडकवासला धरणसाखळीत 77.80 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 5.56 टीएमसीने घट, चारही धरणांत पाण्याची आवक शून्य

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Latest Marathi News Live Update: : पालघरमधील अतिदुर्गम हट्टीपाड्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; पांडुरंग शिंदेंच्या घरी जाऊन केले लक्ष्मीपूजन

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

SCROLL FOR NEXT