alcohol.jpg 
नाशिक

बायकोचा माहेरहून परतण्यास नकार...त्यावर मद्यपी पतीने केला 'असा' धक्कादायक प्रकार

सकाळवृत्तसेवा

नाशिक : माहेरी आलेल्या पत्नीने दारू सोडणार असाल तरच सासरी येईन, असे म्हटल्याचा राग येऊन मद्यपी पतीने केला असा धक्कादायक प्रकार...वारंवार होणाऱ्या भांडणाला कंटाळून बायको माहेरी आली होती त्याचाच राग डोक्यात धरुन हा प्रकार केल्याचे समजते.

अशी आहे घटना

राजेश निवृत्ती खडताळे (रा. मौर्या डेंटल केअरजवळ, अशोकनगर, सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडिता मनिषा राजेश खडताळे यांच्या फिर्यादीनुसार, पीडितेचा संशयित पती मद्यपी असल्याने ती काही दिवसांपासून आई-वडलांकडे माहेरी आली होती. पीडितेला घेऊन जाण्यासाठी संशयित पती आला असता, तू किती दिवस आईवडलांकडे राहते. तू घरी चल असे म्हणत पीडितेला शिवीगाळ केली. त्यावेळी पीडितेने, तुम्ही दारू सोडली, तरच मी घरी येईल, असे सांगितले. त्याचा संशयित पतीला राग आला आणि त्याने पत्नीवर चाकूने हल्ला करीत जखमी केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत. 

दारूमुळे अनेकांच्या जीवनाची राखरांगोळी झाली आहे. दारुच्या आहारी गेलेला व्यक्ती केव्हा काय करेल याचा नेम नसतो. सातपूर येथे घडलेला हा प्रकारही दारुच्या आहारी जाण्यातूनच घडला. याचा फटका मात्र महिलांनाच जास्त सहन करावा लागतो. अशा घटनांमधूनही नागरिक बोध घेत नाहीत, हीच खरी शोकांतिका आहे. जनजागृती केल्यानंतरही मद्यपी शौकीनांची संख्या कमी झालेली नाही. दारूच्या दुकानात लागलेल्या रांगा पाहूनच अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KBC Contestant Arrest : 'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक धक्कादायक कारण आले समोर

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Latest Marathi News Live Update : पेट्रोलवरील उत्पादन शुल्कातील कपात ही सरकारच्या अपयशाचे निदर्शक- खासदार सागरिका घोष

Hardik Pandya ची मन जिंकणारी कृती; मुंबईच्या ग्राऊंड्समन्सना केली आर्थिक मदत... कारण ऐकून वाढेल आदर...

Gold Rate Today: युद्धाचा आणि डॉलरचा सोन्यावर डबल इफेक्ट! मार्चमध्ये सोनं 30 हजारांनी स्वस्त; महाराष्ट्रात आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT