नाशिक

औद्योगिक वसाहतीत दोन दुचाकीची समोरासमोर धडक : एक ठार, एकजण गंभीर जखमी

CD
फोटो : B10813 -- भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक सातपूर, ता. १७ : औद्योगिक वसाहतीतील कार्बन कंपनीसमोर म्हसोबा मंदिराजवळ मंगळवारी (ता. १७) सकाळी सातच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात राजेश कृष्णा भोये (२५, रा. निशाणखडक, ता. पेठ, जि. नाशिक) याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश भोये हा मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास आपल्या (एमएच १५ एलडी ३७८४) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या (एमएच ४१ डीवाय ५७६३) क्रमांकाच्या दुचाकीची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या दुसऱ्या दुचाकीवर महेश दिलीप क्षीरसागर (२१, रा. गायत्री कॉलनी, अशोकनगर, सातपूर) आणि धनंजय समाधान पगार (वय २१, रा. शिवाजीनगर, सातपूर) हे दोघे प्रवास करीत होते. दोन्ही दुचाकींची धडक इतकी भीषण होती की, राजेश भोये याचा गंभीर दुखापतींमुळे घटनास्थळीच मृत्यू झाला. तर महेश क्षीरसागर गंभीर जखमी झाला आहे, प्रकृती चितांजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार्बन नाका परिसरात झालेल्या या भीषण अपघातामुळे औद्योगिक वसाहतीतील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

SCROLL FOR NEXT