नाशिक

डासांचा प्रादुर्भाव वाढला : औषध व धूर फवारणीची नागरिकांची मागणी

CD
फोटो : B10652 सातपूर : येथील रस्त्यावर साचलेला कचरा. -- सातपूर परिसरात डासांचा वाढता प्रादुर्भाव औषध व धूर फवारणीची नागरिकांची मागणी सातपूर, ता. ५ : सातपूर परिसरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी साचलेले ड्रेनेजचे घाण पाणी आणि कचऱ्याचे ढिगारे यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असून, डेंगी व मलेरियासह विविध साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरात औषध फवारणी व धूर फवारणी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. सातपूर परिसरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर कचऱ्याचे मोठे ढिगारे साचले आहेत, तर अनेक ठिकाणी ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. सकाळी आणि विशेषतः सायंकाळच्या वेळी नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. घरांमध्येही डासांची संख्या वाढल्याने लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या परिसरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये ताप, अंगदुखी व इतर आजारांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने डासांची उत्पत्तीस्थळे शोधून ती तात्काळ नष्ट करावीत, तसेच परिसरात नियमित व कायमस्वरूपी औषध फवारणी आणि धूर फवारणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. ---कोट प्रभागनिहाय नियमित औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येत असून, डासांची उत्पत्तीस्थळे शोधून त्यावर कार्यवाही केली जात आहे. उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी परिसरात स्पीकरद्वारे सूचना देण्यात येत आहेत -नारायण जाधव, मलेरिया विभाग ---कोट डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक महिन्यापासून महापालिकेकडून धूर व औषध फवारणी होत नाही. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला असून नागरिक आजारी पडत आहे प्रशासनाने केवळ तक्रारींची वाट न पाहता परिसरात नियमित धूरफवारणी व औषध फवारणी करावी. -कमलबाई इंगळे, स्थानिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT