satpur Police station 
नाशिक

Satpur Police Station: सातपूर पोलिस ठाण्याची नूतन इमारत धूळखात; सातपूरकरांसह पोलिसांनाही प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Satpur Police Station : त्र्यंबक रोडवरील सातपूर पोलिस ठाण्याच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागेच सुमारे चार कोटी रुपये खर्चून नवीन इमारती बांधून उभी राहिली आहे.

परंतु अजूनही पोलिस ठाणे या इमारतीमध्ये स्थलांतरित झालेले नसून, नवीन वर्षात तरी पोलिस ठाणे नवीन इमारतीत जाते की आणखी प्रतिक्षा करावी लागते याकडे सातपूरकरांचे लक्ष लागून आहे. त्याचप्रमाणे, उपनगर, म्हसरुळ आणि पंचवटी पोलिस ठाण्याच्या इमारतींबाबतचे प्रश्न प्रलंबित आहेत.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत १३ पोलिस ठाणे आहेत. यातील सातपूर पोलिस ठाणे एक महत्त्वाचे पोलिस ठाणे मानले जाते. (Satpur police station not shifted to new building nashik news)

औद्योगिक वसाहतीसह कामगार वसाहत आणि नववसाहतींमुळे सातपूर पोलिस ठाण्याची हद्दही वाढली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेवरही कामाचा भार वाढला आहे. त्र्यंबक रोडवरील सकाळ सर्कल येथे सातपूर पोलिस ठाणे आहे.

सद्यःस्थितीत सातपूर पोलिस ठाण्याची जागा कामकाजाच्या दृष्टिकोनातून अपुरी पडते. तक्रार करण्यासाठी येणाऱ्या तक्रारदारांना बसण्यासाठी जागा नाही. पावसाळ्यातही इमारतीचे छत गळते. अशा एक ना अनेक समस्या या जीर्ण झालेल्या इमारतीचे आहेत.

त्यामुळे आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून सातपूर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी सुमारे चार कोटींचा निधी २०२० मध्ये मंजूर झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामकाजालाही प्रारंभ झाला. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे कामाला विलंब झाला.

परंतु आजमितीस पोलिस ठाण्याची नवीन इमारत पूर्णपणे बांधून व रंगरंगोटी करून तयार आहे. परंतु तरीही पोलिस ठाण्याचे स्थलांतर झालेले नाही. त्यामुळे सर्व सोयीसुविधांनी युक्त नवीन इमारत अक्षरश धूळखात पडून आहे.

सुसज्ज नवीन इमारत

सातपूर पोलिस ठाण्यासाठीची नवीन सुसज्ज इमारतीमध्ये आधुनिक दर्जाच्या सोयीसुविधा करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह अधिकारी वर्गांसाठी स्वतंत्र दालन, ठाणे अंमलदार व तक्रारदारांसाठीचे स्वतंत्र दालन आहे. त्याचप्रमाणे, इमारत दुमजली असल्याने पोलिसांच्या कामकाजाच्या दृष्टिकोनातून विभागवार सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

पंचवटी, उपनगर, म्हसरुळ ठाणेही प्रस्तावित

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिस ठाण्याचीही नूतन इमारत प्रस्तावित आहे. सद्यःस्थितीत पंचवटी पोलिस ठाणेच्याच जागेवर नवीन प्रस्तावित इमारतीचा आराखडा तयार आहे. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपल्याने नवीन इमारतीसाठी निधीला अद्याप मंजुरी नाही.

तर, उपनगर पोलिस ठाण्यासाठीही जागा निश्चित झाली आहे परंतु त्याबाबतचा प्रस्तावही शासनदरबारी प्रलंबित आहे. याचप्रमाणे, म्हसरुळ पोलिस ठाणे सध्या मेरीच्या जागेत सुरू असून तीच जागा पोलिस ठाण्यासाठी निश्‍चित करून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.

"सातपूर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झालेले आहे. काही दिवसात त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून पोलिस ठाणे नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. अन्य पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावांसाठीचाही पाठपुरावा सुरू आहे. तेही लवकरच मार्गी लागतील." - चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, मुख्यालय, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT