NSK26H33970 ः सत्यजित बच्छाव
---------
२०-१
सत्यजित बच्छावचे
डावामध्ये ५ बळी
नाशिक ः येथील डावखुरा फिरकीपटू- अष्टपैलू सत्यजित बच्छावने रणजी ट्रॉफीत यंदा सिक्कीमतर्फे खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. दुसऱ्याच सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध डावात ५ बळी त्याने घेतले. सामन्यादरम्यान अरुणाचलच्या दुसऱ्या डावात १७ षटकात २७ धावा घेताना ५ गडी बाद करत अफलातून कामगिरी केल्यामुळे सिक्कीमला अरुणाचल प्रदेशवर एक डाव व ३२८ धावांनी मोठा विजय मिळवता आला. या सामन्यात सत्यजितने एकूण ६ बळी घेतले. त्याआधीच्या मेघालय विरुद्धच्या सामन्यात सत्यजितने ४५ धावा व १ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. नुकत्याच संपलेल्या तिसऱ्या सामन्यात नागालँड विरुद्ध दोन्ही डावात २-२ बळी घेतले. सत्यजित बच्छावने बीसीसीआयच्या रणजी स्पर्धेसोबत सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तिन्ही प्रकारात २०१२ पासूनच महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. भेदक गोलंदाजी बरोबरच खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत सत्यजितने अनेक वेळा मोलाचा वाटा उचलला. या दरम्यान महाराष्ट्र संघाकडून महत्वाचा गोलंदाज म्हणून खेळताना त्याने विजय हजारे ट्रॉफीत ७५ पेक्षा जास्ती बळी घेत सर्वाधिक बळींचा विक्रम आपल्या नावावर केला. तर रणजी ट्रॉफीत ३६ सामन्यात सत्यजित बच्छावने डावखुरया फिरकीने महाराष्ट्र संघातर्फे एकूण १३० बळी घेतले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.