टुडे पान ३ मेन फिचर
लोगो : नव्या वस्त्या; जुन्याच समस्या (आज प्रसिद्ध झालेल्या सीटी टुडे २ वरून लोगो घ्यावा)
----------
NSK26H31324
जळगाव : सत्यम पार्कमधील रस्त्याची दुरवस्था.
------------
NSK26H31325
परिसरातील तुंबलेल्या गटारी.
-----------
NSK26H31326
खुल्या भूखंडावर वाढलेले गवत.
सत्यम पार्क परिसरात गटारी तुंबल्या, रस्त्यांचा अभाव
खुल्या भूखंडांवर वाढले गवत; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मनपाकडे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ : शहराच्या वाढीव वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सत्यम पार्क परिसरात गटारी तुंबल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत, तर अनेक गल्ल्यांमध्ये पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नागरिकरणाचा वेग वाढत असताना पायाभूत सुविधांचा विकास मात्र मागे पडल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे.
सत्यमपार्क परिसरातील गटारींची नियमित स्वच्छता होत नसल्याने सांडपाणी साचून राहते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. अनेक अंतर्गत गल्ल्यांमध्ये अद्याप पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचल्याने पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांची गैरसोय होते.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सांडपाणी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. गटारींची नियमित साफसफाई आणि सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. रस्ते आणि गटारींच्या समस्यांमुळे दैनंदिन कामांसाठी घराबाहेर पडताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चौकट
विकासकामांची प्रतीक्षा
शहराच्या विस्तारित भागात लोकवस्ती वाढत असताना त्यानुसार रस्ते, गटारी आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, सत्यम पार्कसारख्या परिसरात मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. महापालिकेने प्रत्यक्ष पाहणी करून गटारींची स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा आणि अंतर्गत रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
कोट
सत्यम पार्क परिसरात गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गल्ल्यांमध्ये पक्के रस्ते नसल्याने पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागतो. वारंवार समस्या मांडूनही अपेक्षित सुधारणा झालेली नाही. महापालिकेने तातडीने गटारींची स्वच्छता करून अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करावीत.
- सत्यम पार्कमधील रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.