सावली केअर सेंटरची लवकरच उभारणी
-
किशोर देशपांडे : ‘रेडक्रॉस’कडून निवाऱ्यासोबत वैद्यकीय सुविधाही
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : शहरात ज्या कुटुंबांना दीर्घकाळ परावलंबी रुग्णांची सेवा करणे कठीण जाते, त्यांच्यासाठी आधार व्यवस्था रेडक्रॉस सावली केअर सेंटर उभारत असल्याची माहिती कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांनी रविवारी (ता.११) पत्रकार परिषदेत दिली.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे, चेअरमन, रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी आदी यावेळी उपस्थित होते. या सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांना प्रवेश दिला जाईल. सुरवातीस ३० रुग्णांसाठी हे सेंटर असेल. जे एकटे राहू शकत नाहीत, ज्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज असते, अशाांना येथे प्रवेश दिला जाईल. संसर्गजन्य रुग्ण, ज्यांच्यापासून इतरांना त्रास होईल, अशाांना प्रवेश दिला जाणार नाही. क्रिटिकल रुग्णाला प्रवेश असेल. या सेंटरसाठी जागेच्या, इमारतीच्या शोध घेतला जात आहे.
------
चौकट
गरजूंसाठी आधार
रेडक्रास सावली केअर सेंटर हा केवळ सेंटर उभारण्याचा उपक्रम नसून, ज्या कुटुंबांना दीर्घकाळ रुग्णांची सेवा करणे कठीण जाते, त्यांच्यासाठी आधार व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. लोकसहभागही यात घेतला जाणार आहे. अधिक माहितीसाठी जळगाव इंडियन रेडक्रास सोसायटीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.